Rabi Seeds Agrowon
ताज्या बातम्या

Seed Demand : पुणे विभागासाठी ३३ हजार ३६५ क्विटंल बियाण्यांची मागणी

Kharif Season 2023 : खरीप हंगामाची पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयारी सुरू केली असून, पुणे विभागामार्फत कृषी आयुक्तालयाकडे सुमारे ३३ हजार ३६५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

Team Agrowon

Pune News : खरीप हंगामाची पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयारी सुरू केली असून, पुणे विभागामार्फत कृषी आयुक्तालयाकडे सुमारे ३३ हजार ३६५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख ७ हजार २५० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने केला आहे.

मागील तीन ते चार वर्षांमध्ये खरीप हंगामात बियाण्यांची कमी-अधिक विक्री झाली आहे. सरासरी २८ हजार ५१५ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. गेल्या वर्षीही खरिपासाठी २९ हजार ५३० क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती.

कृषी विभागाने मागणीमध्ये ३,८३५ क्विंटलने वाढ केली असून, जवळपास ३३ हजार ३६५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. यामध्ये खासगी कंपन्यांकडून २५ हजार ८६५ क्विंटल, महाबीज व राष्ट्रीय बीज निगम विभागाकडून ७ हजार ५०० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे.

खरीप हंगामासाठी मागणी केलेल्या बियाण्यांमध्ये संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, वाटाणा, ताग आदी पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे.

तसेच, भाताचे १४ हजार ५०० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. त्यानंतर सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याच्या दृष्टीने ९ हजार ५८१ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

पीकनिहाय बियाण्यांची मागणी ः (क्विंटलमध्ये)

वाण --- बियाणे

भात --- १४,५००

संकरित बाजरी --- २३३७

मका --- २७३०

तूर --- १७८

मूग --- ३२६

उडीद --- ११३

सोयाबीन --- ९५८१

इतर पिके --- ३६००

जून महिना जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. खरिपात बियाणांच्या अडचणी येऊ नये म्हणून आताच मोठ्या प्रमाणात बियाण्यांची मागणी केली आहे. लवकरच या खताला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: विदर्भातील ११ जिल्ह्यात पावसाचा इशारा; कमाल तापमानात घट

Agri Drone Technology: ड्रोन तंत्रज्ञानाने शेतीत घडेल क्रांती

Encroachment Regularisation: निवासी अतिक्रमणे नियमित करण्यास सरकारची मंजुरी

Scientific Onion Farming: कांदा लागवडीपासून साठवणुकीपर्यंत शास्त्रोक्त नियोजनावर भर

Farmer Centric Policy: बळीराजा केंद्रबिंदू मानून कृषी सेवेचा वारसा जपा : भोसले

SCROLL FOR NEXT