Lemon Market Agrowon
ताज्या बातम्या

Water Scarcity : पाणीटंचाईमुळे लिंबांच्या उत्पादनात घट, दरात वाढ

Lemon Production : लिंबू उत्पादक भागात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, लिंबांच्या उत्पादनात घट झाली आहे.

Team Agrowon

Pune News : लिंबू उत्पादक भागात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, लिंबांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारातील आवकदेखील घटली आहे.

परिणामी, मागील महिन्याच्या तुलनेत लिंबांच्या भावात वाढ झाली आहे. बाजारात सध्या १५ किलोच्या गोणीमागे महिनाभरात ७०० ते ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर्जानुसार एका गोणीला १ हजार ते १ हजार २०० रुपयांचा दर मिळत आहे.

लिंबू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नगर जिल्ह्यातील राशीन, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पुणे जिल्ह्याच्या इंदापूर, दौंड या भागांत यंदा पावसाने पाठ फिरविली आहे. या भागातून पुणे बाजार समितीमध्ये सध्या सरासरी सुमारे दीड हजार गोण्यांची आवक होत आहे.

गेल्या दीड महिन्यापूर्वी दोन ते तीन हजार गोण्यांची आवक होत होती. मात्र सध्या ही आवक निम्म्यावर आली आहे. बाजारात मागील महिन्यात लिंबांच्या एका गोणीला ४०० ते ५०० रुपयांचा दर मिळत होता. मात्र आता हाच दर १ हजार ते १२०० रुपये झाल्याचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.

मागील महिनाभरापासून लिंबांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भावात मोठी वाढ झाली आहे. बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी होत आहे. किरकोळ विक्रेते, रसवंती चालक मोठ्या आकाराच्या लिंबांची खरेदी करतात. किरकोळ बाजारात ५ रुपये प्रतिनग असा दर आहे.
- रोहन जाधव, लिंबाचे प्रमुख आडतदार, पुणे बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा

SCROLL FOR NEXT