Rabi season
Rabi season Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Season : रब्बीच्या पेरणीत यंदा घट

Team Agrowon

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्र कमी असण्यासोबतच हरभरा व गव्हाचे पेरणी क्षेत्रही कमीच आहे. गव्हाची पेरणी जानेवारीपर्यंत चालत असली तरी ते ४० हजार हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता असून गतवर्षी हेच क्षेत्र ५० हजार हेक्टरवर होते. हरभऱ्याचेही क्षेत्र १३ हजार हेक्टरने कमी झाले आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात यावर्षी सरासरी १ लाख ४८ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित करण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा यंदा तीन हजार हेक्टरने वाढ झाली असली पेरणी क्षेत्र मात्र घटले आहे. गहू व हरभरा ही या हंगामातील मुख्य पिके आहेत. कमी कालावधी व खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून हरभऱ्याकडे बघितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक कल या पिकाकडे राहतो.

गतवर्षी जिल्ह्यात १ लाख २२ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याखाली होते. यंदा मात्र त्यामध्ये घट आली असून १२ हजार ९९८ हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. हरभऱ्याचे क्षेत्र कमी होत असतानाच गव्हाचीही पेरणी कमी झाली आहे. आतापर्यंत केवळ १३ हजार १०१ हेक्टरमध्येच पेरणी झाली असून एकूण सरासरी क्षेत्रापैकी २६ हजार १४९ हेक्टर क्षेत्र शिल्लक आहे. या क्षेत्रात आगामी काळात पेरणी अपेक्षित केली तरी जिल्ह्यात या पिकाखाली ४० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र पेरणीखाली येणार आहे. गतवर्षी ५० हजार ४७६ हेक्टरमध्ये पेरणी होती.

गव्हासाठी पाच किंवा त्यापेक्षा अधिक पाळ्या पाणी लागते. यंदा सिंचनासाठी पाणी मुबलक असले तरी वीज पुरवठ्याची समस्या आहे. सद्या जमिनीत ओलावा असल्याने पेरण्या लांबल्याचे कारण समोर करण्यात येत असले तरी उत्पादनाच्या तुलनेत खुल्या बाजारात दर न मिळणे व वीजपुरवठा नियमित नसणे या समस्यांमुळे पेरणी कमी करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले

आहे.

दोन वर्षांतील पेरणीची तुलना

वर्ष २०२१ २०२२

गहू ५०,४७६ १३१०१

हरभरा १२२३१८ १०९३२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT