Jowar Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Jowar Sowing : ज्वारी, बाजरीच्या क्षेत्रात घट

रभणी जिल्ह्यातील खरीप ज्वारी, बाजरी या पारंपारिक पौष्टिक तृणधान्याच्या क्षेत्रात गेल्या ७ वर्षांत मोठी घट झाली आहे.

Team Agrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील खरीप ज्वारी (Kharif Jowar), बाजरी (Pearl Millet) या पारंपारिक पौष्टिक तृणधान्याच्या (Millet Crop Sowing) क्षेत्रात गेल्या ७ वर्षांत मोठी घट झाली आहे. ज्वारीचे क्षेत्र २९ हजार ९५८ हेक्टरने, तर बाजरीचे क्षेत्र ३ हजार ३३६ हेक्टरने कमी झाले आहे.

राळे, भगर या तृणधान्यांचे क्षेत्र नगण्य आहे. कमी बाजारभाव, काढणीसाठी मजुरांची समस्या, आहातील कमी समावेश, सोयाबीन, हरभरा यांसारख्या नगदी पिकांकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कल आदी कारणांमुळे ज्वारी, बाजरी यासह अन्य तृणधान्यांचे क्षेत्र कमी होत आहे.

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव दुकानावर विविध योजनांच्या लाभार्थींना माफक दराने गहू, तांदूळ उपलब्ध होत आहे. ज्वारी, बाजरीचा आहारातील वापर कमी झाला आहे. मागणी कमी आहे. बाजार भाव कमी आहेत.

उत्पादन खर्च वाढला आहे. काढणीसाठी मजुरांची समस्या आहे. यांत्रिकीकरण मर्यादित आहे. शेतकऱ्यांकडील पशुधनाची संख्या कमी झाली आहे.

शिवाय जनावराच्या विविध चारा पिकांचे पर्याय आहेत. त्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात घट होत आहे. राळे, भगर यांचा वापर मर्यादित असल्यामुळे पूर्वीपासूनच क्षेत्र मर्यादित आहे. परंतु गेल्या काही वर्षांत क्षेत्र नगण्य झाले आहे.

परभणी जिल्ह्यात २०११-१२ ते २०१५-१६ या पाच वर्षांच्या कालावधीत खरीप ज्वारीचे क्षेत्र सरासरी ३२ हजार ६१८ हेक्टर आणि उत्पादकता प्रतिहेक्टरी ८.५७ क्विंटल होती. खरीप ज्वारीच्या क्षेत्रात मागील ७ वर्षात २९ हजार ९५८ हेक्टरने घट झाली आहे.

बाजरीचे सरासरी ३ हजार ३५९ हेक्टर आणि उत्पादकता प्रतिहेक्टरी ५.६४ क्विंटल होती. यंदा (२०२२) ज्वारीची २ हजार ६५४ हेक्टरवर आणि बाजरीची २२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. बाजरीच्या क्षेत्रात मागील ७ वर्षांत ३ हजार ३३६ हेक्टरने घट झाली.

रब्बी ज्वारीचेही क्षेत्र घटतेय

रब्बी ज्वारीचे अन्नधान्य आणि कडब्यासाठी महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांत या मजुरांची समस्या, कमी बाजारभाव, आहारातील कमी प्रमाण आदी कारणांमुळे क्षेत्रदेखील कमी होत आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र २ लाख ३८ हजार ६३६ हेक्टर होते. परंतु मागील पाच वर्षांत त्यात १ लाख १३ हजार ८९ हेक्टरपर्यंत घट झाली आहे. २०२१ मध्ये ८१ हजार १४१ हेक्टरवर, तर यंदा आजवर ८० हजार ५६० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.

ज्वारी, बाजरीचा आहारात समावेश गरजेचा...

ज्वारी, बाजरीचे आहारातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाने जस्त आणि लोहाचे प्रमाण अधिक असलेला ज्वारीचा परभणी शक्ती आणि बाजरीचा एएचबी- १२६९ हे वाण विकसित केले आहेत. पोषणमूल्ययुक्त आहारासाठी या तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT