Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shidne : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; मदतीबाबत लवकरच निर्णय

या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा पूर्ण करून दुसऱ्या दिवशी तातडीने सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.

Team Agrowon

Nashik News जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिल या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस, गारपिटीने (Hailstorm) पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. सटाणा, मालेगाव, चांदवड, निफाड, देवळा, नाशिक, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, दिंडोरी तालुक्याला मोठा फटका बसला आहे.

या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अयोध्या दौरा पूर्ण करून दुसऱ्या दिवशी तातडीने सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रिमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊन या वेळी शेतकऱ्यांना धीर दिला.

मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाणे, निताणे, आखतवाडे, पिंगळवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उत्राणे, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, नामपूर ब्राह्मणगाव, लखमापूर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी (ता. ८) विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळ कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डाळिंब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

या वेळी पालकमंत्री दादा भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, माजी आमदार संजय चव्हाण, निताणेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.

नुकसानीचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्या

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानीचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT