Paddy Production Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Bonus : धानाला बोनस देण्याचा निर्णय अधिवेशनात ः सत्तार

पूर्व विदर्भातील धान उत्पादकांची बोनसची मागणी आहे. त्यासोबत परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

गोंदिया ः पूर्व विदर्भातील धान उत्पादकांची (Paddy Producer) बोनसची (Paddy Bonus) मागणी आहे. त्यासोबत परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या (Paddy Crop Damage) भरपाईबाबत हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली.

कृषिमंत्री सत्तार हे गोंदिया दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्तार म्हणाले, की परतीच्या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याकरिता भरपाईचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भाने हिवाळी अधिवेशनात घोषणा होईल. धानाला बोनस देण्याचा प्रस्तावही विचाराधीन असून त्याविषयी देखील अधिवेशनात जाहीर केले जाणार आहे.

राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सध्या दोन समित्या काम करीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्‍न जवळून अनुभवता यावे याकरिता एक दिवस बळीराजासोबत ही योजना राज्यभर राबविली जात आहे.

या माध्यमातून शेतकरी आत्महत्या येत्या काळात थांबतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. त्याकरिता विदर्भातील शेतीवर विशेष फोकस केला जात आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन धमक्‍या येत असल्याबाबत विचारणा केली असता, अशा धमक्‍यांना महाराष्ट्र भीक घालत नाही.

मराठी माणसांच्या संरक्षणासाठी जो पुढे येईल, त्याच्यापाठीशी महाराष्ट्र राहील, असे ते म्हणाले. महाराष्ट्राबद्दलचे प्रेम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिकवू नये असा टोला ही त्यांनी यावेही लगावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT