Crop insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : हरभरा, गहू पीकविमा अर्जांसाठी गुरुवारपर्यंत मुदत

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू (बागायती) या पिकांसाठी विमा संरक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांना गुरुवार (ता. १५) पर्यंत पीकविमा अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

हिंगोली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू (Rabi Wheat) (बागायती) या पिकांसाठी विमा संरक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांना गुरुवार (ता. १५) पर्यंत पीकविमा अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय- लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट, नैसर्गिक आपत्ती यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी विमा संरक्षण मिळणार आहे.

पीकविमा हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल(pmfby.gov.in) सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करून विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे यांनी केले आहे.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम, प्रतिहेक्टरी हप्ता रुपये

पीक विमा संरक्षित रक्कम शेतकरी हिस्सा विमा हप्ता

हरभरा ३७५०० ५६२.५०

गहू ४२००० ६३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT