Solar Power Agrowon
ताज्या बातम्या

Solar Electricity : सौरऊर्जा प्रकल्पाने आदिवासी पाड्यातील अंधार कायमचा दूर

Solar Project : अकलोली येथील जाणीव प्रतिष्ठानतर्फे समाजातील दुर्बल व दुर्गम भागातील लोकांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

Team Agrowon

Akola News : अकलोली येथील जाणीव प्रतिष्ठानतर्फे समाजातील दुर्बल व दुर्गम भागातील लोकांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सौरऊर्जेचा परिपूर्ण वापर करून विद्युत ऊर्जेची बचत करणे, तसेच ग्रामीण भागात तांत्रिक अडचणींमुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. कधी कधी मोठा बिघाड असल्यास पावसाळ्यासारख्या दिवसांत दोन दोन दिवस विद्युत पुरवठा पूर्ववत होत नाही, यावर उपाय म्हणून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले.

या परिसतील गाव, खेडो-पाड्यात दुर्गम भागातील ग्रामस्थांची विजेअभावी होणारी ही परवड थांबावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प सादर करण्यात आला. जाणीव प्रतिष्ठान आणि ई हँड्स सस्टनेबिलिटी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गोराड-धोदडेपाडा येथील ५४ घरे व केलठण तसेच झाटेपाडा येथील ४३ घरांतील अंधार दूर केला आहे.

येथील प्रत्येक घरामध्ये दोन ट्यूबलाईट व एक पंखा सौरऊर्जेवर चालण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच आगामी काळात सहा दुर्गम पाड्यांतील घरांमधील अंधार कायमस्वरूपी दूर करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज ही खिशाला परवडणारी नसल्याने त्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत भाजीपाल्याची शेती करणे अत्यंत अवघड जाते. त्यासाठी पर्याय

म्हणून सौरऊर्जेवर चालणारे पंप जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती जाणीव प्रतिष्टानचे भूपेंद्र शाह व उमेश महाडिक यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT