Elephant Rampage Agrowon
ताज्या बातम्या

Elephant Rampage : वीजघर गावात पुन्हा हत्ती दाखल; रब्बी पिकांचे नुकसान

दोन महिन्यांनंतर जिल्ह्यातील वीजघर (ता. दोडामार्ग) गावात हत्ती पुन्हा दाखल झाले असून, रब्बी पिकांचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः दोन महिन्यांनंतर जिल्ह्यातील वीजघर (ता. दोडामार्ग) गावात हत्ती (Elephant Rampage) पुन्हा दाखल झाले असून, रब्बी पिकांचे नुकसान (Rabi Crop Damage) करण्यास सुरुवात केली आहे. हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील तिलारी परिसरातील अनेक गावांमध्ये हत्तींचा उपद्रव होतो. वीजघर, बाबर्डे, झोळंबे, तळकट, मार्ले, केर, हेवाळे आदी परिसरांतील अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर असतो. या भागातील सर्वच फळपिकांचे हत्ती नुकसान करतात. याशिवाय बांबू, भातपीक, नाचणी आदी पिकाची देखील नासाडी करतात.

परंतु नोव्हेंबरपासून दोडामार्गात हत्तींचा वावर दिसून आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भातपीक, नाचणी, चवळी, मूग, कुळीथ यांसह विविध कडधान्यांची लागवड केली होती.

परंतु रविवारी सायंकाळी वीजघर बांबर्डे परिसरात हत्तींचे दर्शन गावातील काही शेतकऱ्यांना झाले. या हत्तींनी गावात आगमन करताच शेतीचे नुकसान सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे

दरम्यान, ऑक्टोबर अखेरपासून लगतच्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील जंगलात हत्तींचा वावर होता. दरवर्षी या कालावधीत हे हत्ती तिलारी खोऱ्यातून या परिसरात जातात, त्यानंतर पुन्हा दोडामार्गात येतात.

आता लवकरच या भागात काजूबोंडू तयार होतील. याशिवाय फणसाच्या झाडांना देखील फळे पडण्यास सुरुवात होईल. त्यामुळे हत्तींचा कळप आता याच भागात स्थिरावेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होईल या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT