Crop Damage
Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : ‘स्टोन क्रशरच्या धुळीमुळे आमच्या आयुष्याची माती’

अभिजीत डाके

सांगली ः कळशीने पाणी घालून दुष्काळात द्राक्ष बागा (Vineyard) जगवल्या. आता म्हैसाळचे पाणी (Mhaisal Irrigation Scheme) आले. पण पीक घ्यायला वाव नाही. स्टोन क्रशरच्या धुळीने (Stone Crush Dust) पीक संपले आहे. चौथे वर्ष आहे, रुपयाचे उत्पन्न नाही. मी आत्महत्या करणार होतो. भावाने अडवले. एक एकर बाग तोडून टाकली. क्रशरमुळे आमच्या आयुष्याची माती (Crop Damage) केली, अशी व्यथा भोसे (ता. मिरज) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अंकुश जाधव यांनी मांडली.

मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी सह भोसे परिसर तसा दुष्काळीच. भोसे, सिद्धेवाडीच्या माळावर शेतकऱ्यांनी द्राक्षाची लागवड केली. त्याच वेळी अंकुश जाधव यांनी २००१ च्या दरम्यान द्राक्ष बाग लागली. दुष्काळ असल्याने कळशीने पाणी घालून बागा जगवल्या. गोड आणि रसाळ द्राक्षामुळे आमचे जीवनही गोड होऊ लागले होते. दोन पैसे हाती पडत होते. डोंगरवाडीतून म्हैसाळचे पाणी आमच्या शेतीला मिळाले. त्यामुळे शाश्वत पाणी झाले. द्राक्षासाठीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बागेचे क्षेत्र वाढवले. वर्षभर शेतात राबतोय. चार महिन्यांत सगळ संपून जात आहे.

सिद्धेवाडी भोसे, गुंडेवाडी परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून स्टोन क्रशर, दगडी खाणी, मुरूम उपसा सुरू आहेत. त्यापैकी एक क्रशर एका मंत्र्याच्या मुलाचा असून त्यात तीन भागिदार आहेत. याशिवाय बडे कंत्राटदार, राजकारणी यांच्या मालकीचे दगड क्रशर, दगडी खाण व मुरूम उपसाची ठिकाणी आहेत. यात बडे लोक सामील असल्याने सामान्य शेतकरी त्यांना काही जाब विचारू शकत नाहीत.

त्यामुळे बंद करण्यासाठी वारंवार मागणी केली असून आम्हालाच तक्रार मागे घेण्यासाठी अनेकांनी सांगितले. परंतु आम्ही मागे हटलो नाही. गेल्या चार वर्षांपासून क्रशर बंद करण्यासाठी वारंवार मागणी केली, परंतु मागणीला जिल्हा प्रशासनासह अन्य अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. क्रशरच्या धुळीमुळे गेल्या तीन वर्षांपासून द्राक्षाची फळधारणा होत नव्हती. वर्षभर राबायचे. हातात काहीच नाही. यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता.

परंतु घरातील लोकांनी त्यांना अडवले. शेवटी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. याच ठिकाणी पाच ते सहा वस्त्या आहेत. सुमारे २०० कुटुंब असून ४५ एकर शेती आहे. शेतापासून अवघ्या २०० फुटांवर स्टोन क्रशर आहे. क्रशरच्या जवळपास ४०० एकर शेती आहे. सुमारे ४५० ते ५०० एकरावरील द्राक्ष पिकांसह अन्य पिकांना फटका बसत आहे.

संकट चोहोबाजूंनी

भोसे पंचक्रोशीत स्टोन क्रशरचा धुरळा, खाणीसाठी पन्नास पन्नास फूट खोलीवर ब्लास्टिंग, मुरमाचा बेसुमार उपसा, कच्‍च्या रस्त्याने धावणारे मोठे डंपर आणि त्यातून उडणारी धूळ अशी समस्यांची मालिका उभी आहे. स्फोटामुळे पाण्याचे जिवंत झरे आटलेत. कूपनलिका, विहिरींच्या पातळीवर परिणाम झाला आहे, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. सिद्धेवाडीत तर रस्त्याची चाळण झाली असून, ‘धुळवाडी’, असे नवे नाव द्यावे, इतकी वाईट स्थिती असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही क्रशर बंद करण्याची मागणी करतो आहे. हे क्रशर दस्तूर खुद्द मंत्र्यांचे आहे. त्यामुळे ते आम्हाला न्याय कसा देतील. पण त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही न्याय कोणाकडे मागायचा?
अंकुश जाधव, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT