Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Sowing Update : यंदा खरिपात सात लाख ४९ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे. तसेच कृषी विभागाकडून २७ लाख बी. टी. पाकिटांची मागणी शासमाकडे करण्यात आलेली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Jalgaon News : गेल्या वर्षी कापसासह खरिपाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात मात्र शंभर टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. यंदा खरिपात सात लाख ४९ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

२७ लाख पाकिटांची मागणी

यंदाच्या खरीप हंगामासाठी २७ लाख ९२ हजारांवर बी.टी.बियाणे पाकिटांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. शेतकरी कपाशीकडे नगदी पीक म्हणून पाहतात. यामुळे कपाशीत तोटा झाला तरी कपाशीचा पेरा जळगाव जिल्हयात अधिक आहे. नगदी पीक दुसरे नाही.

यंदाचा संभाव्य पेरा

जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पिकांचा पेरा आहे. त्या सर्वाधिक पेरा कपाशीचा ५ लाख ५८ हजार हेक्टर आहे. त्या खालोखाल खरीप ज्वारी १ हजार ९२६ हेक्टर, सोयाबीन १८ हजार ९५० हेक्टर आहे.

Kharif Sowing
Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

उडीद, मुग, तुरीचे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात शेतकरी घेतील. उडीद, मुग, तूर पावसावर अवलंबून असतात. पहिला पाऊस झाल्यानंतर शेंगा लागण्यापूर्वी पाऊस आला नाही तर, उत्पादन अधिक येत नाही. शेंगा लागल्यानंतर अधिक पाऊस झाला तर पिकांचे नुकसान होते. यामुळे शेतकरी अतिशय कमी प्रमाणात ही पिके घेतात.

यंदा आचारसंहितेमुळे पालकमंत्री खरीपपूर्व आढावा बैठक घेऊ शकत नाही. यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद घेतील. यात यंदाचा असणारा पाऊस, पिकांचे नियोजन, खतांचे नियोजन, बँकांनी शेतकऱ्यांसाठी कर्ज देणे आदी बाबींचे नियोजन होईल.
के. एम. तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com