Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Shaktipeeth Highway : कोल्हापूर जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. परंतु हा महामार्ग शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे.
Shaktipeeth mahamarg
Shaktipeeth mahamargagrowon

Kolhapur Shaktipeeth Highway : कोल्हापूर जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. परंतु हा महामार्ग शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असून, कोणतीही मागणी नसताना जनतेवर लादला जात आहे. या विरोधात रस्त्यावरच्या लढाईला तयार राहण्याची तयारी शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन माजी आ. के. पी. पाटील यांनी केले.

शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने वाघापूर (ता. भुदरगड) येथे निर्धार सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. संजय घाटगे उपस्थित होते. यावेळी करवीर, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी एकमताने शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला.

नेत्यांना कमिशन देणारा महामार्ग

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील म्हणाले, या महामार्गासाठी पिकाऊ जमीन जाणार आहे, तरीही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे म्हणणारे आमदार आणि खासदार या महामार्गाच्या विरोधातील लढ्यात सामील होत नाहीत, याचे कारण काय? तर ठेकेदाराला पोसणारा आणि आमदार-खासदारांना कमिशन देणारा हा महामार्ग आहे. हे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात काय, याचा विचार करण्याची वेळ तुम्हा आम्हावर आली आहे.

समितीचे निमंत्रक का सम्राट मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आ. संजय घाटगे, कॉ. धनाजी गुरव, शिवसेना - संपर्कप्रमुख विजय देवणे, कॉ. संपत - देसाई, राम कळंबेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सचिन घोरपडे, सरपंच सर्जेराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मच्छिद्र मुगडे, स्वप्निल साळुंखे, शिवाजी मगदूम, आनंदा पाटील, कृष्णा भारतीय, सचिन भांदिगरे, रवी देसाई, भुदरगड, आजरा, कागल, करवीर तालुक्यातील शेतकरीवर्ग उपस्थित होता. यावेळी एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com