Crop Damage : ओल्या दुष्काळासाठी परभणीत बेधडक मोर्चा

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष्य आहे. या सरकारमधील कृषिमंत्री बेजबाबदार आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

परभणी ः अतिवृष्टी (Heavy Rain) बाधित शेतकऱ्यांच्या मदतीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष्य आहे. या सरकारमधील कृषिमंत्री बेजबाबदार आहेत. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी थेट मंत्रालयावरच बेधडक मोर्चा काढू. सरकारला ‘दे माय धरणी ठाय’ करू,’’ असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (ता.१५) परभणी येथे दिला.

Crop Insurance
Crop Damage Compensation : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीअभावी मदतच मिळेना

परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या बेधडक मोर्चानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र वायकर, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, ज्योती ठाकरे, सखूबाई लटपटे, जिल्हा प्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, डॉ. विवेक नावंदर आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, ‘‘राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे नाही, भांडवलदारांचे आहे. जिल्हा प्रशासन तसेच विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.’’वायकर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत. परभणीत ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अदा करावी. जायकवाडी, येलदरी, दुधना धरणाचे पाणी सिंचनासाठी सोडावे. कृषिपंपांना २४ तास अखंड वीजपुरवठा करावा. वीजबिल माफी करावी. शेतमजूर, बेरोजगारांना काम द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाप्रशासनास देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com