Rain update Agrowon
ताज्या बातम्या

Nagar Rain Damage : नगर जिल्ह्यात वादळाने मोठे नुकसान

Rain Update Nagar : शेवगाव तालुक्यातील दहिगावणे, रांजणी भागात सुमारे वीस एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात रविवारी (ता. ४) दुपारनंतर झालेल्या वादळाचा मोठा फटका नगर जिल्ह्यातील विविध भागांना बसला आहे. शेवगाव तालुक्यातील दहिगावणे, रांजणी भागात सुमारे वीस एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले आहे. अकोल्यातील प्रसिद्ध सांदणदरी पाहण्यासाठी मोठे संख्येने पर्यटक आले होते. मात्र जोरदार पावसामुळे सुमारे ५०० पर्यटक दरीमध्ये अडकले होते.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिक व गाइडच्या मदतीने पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. अकोल्यात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.

नगर जिल्ह्यातील नगर, शेवगाव, पाथर्डी, अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, राहुरी, राहाता तालुक्यांत रविवारी (ता. ४) दुपारनंतर पाऊस व वादळी वाऱ्याचा तडाखा बसला.

अकोले तालुक्यातील अकोले, राजूर, कोतुळ, शेंडी, म्हाळादेवी परिसरात रविवारी (ता. ४) दुपारी साडेबारा वाजता वादळ व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे वृक्ष उन्मळून पडले, तर शेतातील पिकांचेही मोठे नुकसान झाले. म्हाळादेवी येथे वीज अंगावर पडून रामदास लक्ष्मण उघडे (वय ५६) या आदिवासी मजुरासह शेळीचा मृत्यू झाला.

पाऊस व वादळाने तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्ष पडले आहेत. शनिवारी, रविवारी सुट्टी व भंडारदरा धरण परिसरात सुरू असलेला काजवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सध्या भंडारदरा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी आहे. जिकडेतिकडे पर्यटकांच्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळत आहेत. यातील काही

पर्यटकांनी शनिवारी (ता. ३) रात्री काजवा महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घेऊन रविवारी दुपारी सांदण दरी गाठली. पावसामुळे पर्यटक दरीत आडकले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पाथर्डीत वादळीने खरंवडीजवळील टोलनाक्याचे नुकसान झाले. शेवगाव तालुक्याली रांजणीत बाबासाहेब माताडे, आबासाहेब माताडे, कैलास कर्डीले, अकोल उगले, निवृत्ती गायके, भगवान चव्हाण आदी शेतकऱ्यांच्या वीस एकरांपेक्षा अधिक केळीचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kadba Kutti Machine Scheme: शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ५० टक्के अनुदान

Beekeeping Business : मधमाशीपालनात करिअरच्या मोठ्या संधी

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील उपोषणावर; आंदोलकांचा मंत्रालय,बीएमसीकडे मोर्चा

Cotton Thrips Control: कपाशीवरील तुडतुडे आणि फुलकिड्यांचे प्रभावी व्यवस्थापन

Rain Crop Damage : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT