Agriculture Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : ‘ताकारी’च्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा

ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे यंदाचे दुसरे, तर पहिले उन्हाळी पाणी आवर्तन सुरू केले आहे. या योजनतून दुष्काळी भागातील शेतीला पाणी पोहोचले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Agriculture Irrigation सांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे (Takari Irrigation Scheme) यंदाचे दुसरे, तर पहिले उन्हाळी पाणी आवर्तन (Water Cycle) सुरू केले आहे.

या योजनतून दुष्काळी भागातील शेतीला पाणी (Agriculture Irrigation) पोहोचले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी दिले जाणार असल्याची माहिती ताकारी उपसा सिंचन योजनेच्या सूत्रांनी दिली.

‘ताकारी’चे पाणी १५ फेब्रुवारीला सुरू झाले असून बारमाही पिकांसह उन्हाळी शेतीला या पाण्याचा भरपूर फायदा होत आहे. दहा दिवस कडेगाव तालुक्यातील क्षेत्राला पाणी दिल्यानंतर पाण्याने खानापूर तालुक्यात प्रवेश केला. पुढे ते तासगाव तालुक्यात जाणार आहे. उन्हाळ्यातील या पाण्याने लाभक्षेत्रातील पिकांना दिलासा दिला.

दरम्यान, लांब पल्ल्यावर जाताना मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब भरपूर राहावा यासाठी टप्पा १ आणि २ वरील प्रत्येकी ११ पंप सुरू करण्यात आले आहेत. टप्पा ३ वरील ३ व ४ वरील २ पंपांचे पाणी सोनहिरा खोऱ्यातील सिंचनक्षेत्रासाठी सोडण्यात आले. प्रत्येक पोटकालव्यांवरील शेवटच्या शेतकऱ्याला भरपूर पाणी मिळेपर्यंत पाणी सुरूच राहणार आहे.

पाण्याचा लाभ बारमाही बागायती शेतीसह कडेगाव, खानापूर, पलूस व तासगाव तालुक्यांतील बऱ्याच गावांच्या पाणी योजनांना होतो. सध्या कडक उन्हाळा व शेतीला पाण्याची निकड, शिवाय मुख्य कालव्याच्या शेवटच्या टोकाला १४४ किलोमीटरवर पाणी पोहोचवायचे असल्याने महिनाभर तरी कालवा वाहण्याची शक्यता आहे.

हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे यंदाचे दुसरे तर पहिले उन्हाळी पाणी आवर्तन सुरू आहे. हे पाणी कालव्याच्या शेवटी १४४ किलोमीटरवर सोनी, भोसे या मिरज तालुक्यातील गावापर्यंत पोहोचवणार आहे. या योजनेमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येणार आहे. त्यामुळे शेकतरी समाधानी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT