Ghod Dam
Ghod Dam Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : जिल्ह्यातील नऊ धरणांतून उन्हाळी पाण्याचे आवर्तन

Team Agrowon

Pune News पुणे : रब्बी हंगामातील (Rabi Season) विविध पिके वाढीच्या व काढणीच्या (Rabi Crop Harvesting) अवस्थेत आहेत. या पिकांसाठी पाण्याची अडचण येऊ नये म्हणून पुणे जिल्ह्यातील नऊ धरणांतून उन्हाळी आवर्तन (Agriculture Irrigation) सोडण्यात आले आहे.

डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांस पाण्याचा विसर्ग सोडल्याने याचा फायदा आंबेगाव, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यांतील शेतकऱ्यांना होत आहे.

जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा यंदा झाला होता. गेल्या पाच महिन्यांत पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे.

सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने जिल्ह्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी धरणांतून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून नुकतेच पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एक ते दीड महिन्यापूर्वीही रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. त्या वेळी पिके वाढीच्या अवस्थेत होती. त्यामुळे धरणातील पाणीपातळी हळूहळू कमी होत आहे.

पूर्व भागातील शेतकरी डाव्या, उजव्या कालव्यातील पाण्यावर विविध पिके घेत असतो. यंदाही शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफूल, मका, फळबागा घेतल्या आहेत.

याशिवाय कांदा बटाटे, भाजीपाला याचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कालव्यालागत असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा यावर अवलंबून आहे.

त्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने या धरणांतील पाण्यावर शेतकरी अवलंबून आहे. सोडलेल्या पाण्याचा कालावधी निश्‍चित नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात असून मे महिन्यापर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे.

त्यानुसार पाटबंधारे विभाग योग्य ते नियोजन करीत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे.

धरणनिहाय सोडण्यात आलेला विसर्ग, क्युसेकमध्ये :

धरण -- डावा कालवा -- उजवा कालवा

खडकवासला -- २६७ -- १०५४

चासकमान -- ५०० -- ०

वीर --- ८२७ -- १४००

पिंपळगाव जोगे -- २६० -- ०

येडगाव -- १४०० -- ०

वडज -- १५२ -- ०

डिंभे --- ६५० -- ०

घोड -- ४७५ -- १५०

उजनी -- १४५३ -- ३०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT