Hailstorm Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm Crop Damage : सोयगाव तालुक्यात पिकांना गारपिटीने पुन्हा झोडपले

सोयगाव तालुक्यात बुधवारी (ता. २६) वादळाचा तडाखा बसला. त्यानंतर गुरुवारी (ता. २७) पुन्हा जवळपास ११ गावांत अर्धा तास गारपीट झाली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar सोयगाव तालुक्यात बुधवारी (ता. २६) वादळाचा तडाखा बसला. त्यानंतर गुरुवारी (ता. २७) पुन्हा जवळपास ११ गावांत अर्धा तास गारपीट (Hailstorm) झाली. सोबतच वादळी पावसाचा जोरही कायम राहिला.

त्यामुळे सोयगावसह परिसरात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबाग पिकांना मोठा फटका बसला आहे.

सोयगाव तालुक्यातील वरठाण, बनोटी, पळाशी, नायगाव, वाडी, तिडका, बोरमाळ, गोंदेगाव, वाकडी, वनगाव, घोरकुंड आदी ११ गावांत गुरुवारी दुपारी जोरदार गारपीट झाली. गारांचा आकार लिंबासारखा होता.

सोयगाव शहरासह परिसरात बुधवारी (ता.२६) वादळी पावसाचा चार गावांना तडाखा बसला होता. सोयगाव शहर तब्बल अर्ध्या तास वादळाच्या विळख्यात अडकले होते. या वादळाचा सोयगाव, फर्दापूर, जरंडी, निंबायती या चार गावांना तडाखा अधिक बसला.

सोयगाव जवळील बनोटी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. शहरात वीजपुरवठ्याच्या तारा कोसळल्या. त्यामुळे शहराचा वीजपुरवठा ठप्प झाला. जरंडीसह परिसरात गारपीट झाली. बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, पाचोड, विहामांडवा, गंगापूर, मांजरा, भेंडाळा, शेंदूरवादा, तुर्काबाद, निल्लोड, गोळेगाव, अजिंठा, सोयगाव, सावलदबारा या मंडळात वादळी पावसाने हजेरी लावली. विहामांडवा मंडळात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sachin Ahir: सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली; शिंदेंच्या सेनेकडून उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

Agriculture Advisory: मातीचे आरोग्य, कीटकनाशकांच्या संतुलीत वापराबद्दल मार्गदर्शन

Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची मशागतीला साथ!

Cotton Seed Distribution: ‘कापूस उत्पादकता’अंतर्गत घुसर येथे शेतकऱ्यांना बियाणे वाटप

Farm Road Issue: पहिल्याच पावसात शेतकऱ्यांची वाट बिकट

SCROLL FOR NEXT