Rabi Crop Damage : जालन्यात फळबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान

घनसावंगी तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यांनी जोरदार धुमाकूळ घातला. जोरात पाऊसही झाला.
Hailstorm
HailstormAgrowon

Jalna News : जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील काही भागांत, तसेच इतर काही ठिकाणी मंगळवारी (ता.२५) दुपारनंतर वादळी पावसाने दणका दिला. त्यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले. उन्हाळी पिकांनाही फटका बसला आहे.

घनसावंगी तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यांनी जोरदार धुमाकूळ घातला. जोरात पाऊसही झाला. दैठणा खुर्द, तीर्थपुरी, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव या भागात गारपीट झाली. त्यामुळे कांद्याचे नुकसान झाले. त्याचबरोबर मोसंबी, आंबे या फळबागांत झाडाखाली मोसंबी व आंब्याचा सडा पडला.

Hailstorm
Crop Damage In Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीमुळे नुकसान

द्राक्ष व डाळिंबाचे नुकसान झाले. पाथरवाला बुद्रुक येथील बस स्थानक परिसरात, ढोणवाडीत विद्युतपुरवठा खंडित झाला. गोंदी परिसरासह एकलहेरा गावात गारांचा पाऊस झाला. अंबड तालुक्यात, आलमगाव परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे वीजपंप, पिठाच्या गिरण्या याचबरोबर घरातील विजेवर चालणारी उपकरणे ठप्प झाली.

Hailstorm
Nashik Crop Damage : नाशिकमध्ये गारपिटीने ४३ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

वडीगोद्री परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह मोसंबी, आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळी हंगामातील टरबूज, खरबूज आदी पिके नेस्तनाबूत झाली. गारपिटीमुळे शेतकरी नुकसानीच्या गर्तेत सापडला आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडाले. गारपिटीने जनावरे जखमी झाली.

वडीगोद्री, सुखापुरी व गोंदी महसूल मंडलात गारपीट झाली. करंजाळा, पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हदगाव, वडीगोद्री, धाकलगाव, भणंग जळगाव आदी भागांत गहू, हरभऱ्यासह मोसंबी, आंबा बागांची फळगळ होऊन मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली.

निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून मदत द्यावी.
- सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com