Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : रब्बीसाठी पीकविमा योजना लागू

‘‘जिल्ह्यात पंतप्रधान रब्बी पीकविमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व हरभरा पिकासाठी पीकविमा योजना लागू झाली आहे.

Team Agrowon

नांदेड : ‘‘जिल्ह्यात पंतप्रधान रब्बी (Rabi) पीकविमा (Crop Insurance) योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व हरभरा पिकासाठी (Crop) पीकविमा योजना लागू झाली आहे. जिल्ह्यातील कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येईल. रब्बी हंगामातील पिकांसाठी १.५ टक्का असा मर्यादित आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्‍चात नुकसान आदी जोखीम यामध्ये समाविष्ट केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागू आहे. बागायती गहू या पिकासाठी पीकविमा संरक्षित रक्कम हेक्टरी ४२ हजार ५०० रुपये आहे. तर विमा हप्ता ६३७ रुपये ५० पैसे आहे. यासाठी नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हदगाव या तालुक्यांना विमा लागू आहे. ज्वारी (जि) या पिकासाठी पीक विमा संरक्षित रक्कम ३३ हजार ७५० रुपये आहे. तर विमा हप्ता ५०६.२५ रुपये आहे. ज्वारीसाठी नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव या तालुक्यांना विमा लागू आहे.

हरभरा या पिकासाठी पीकविमा संरक्षित रक्कम ३७ हजार ५०० रुपये आहे. यासाठी हेक्टरी ५६२.५० रुपये विमा हप्ता आहे. हरभऱ्यासाठी नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, देगलूर, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी या तालुक्यांना विमा लागू आहे.

युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे ही योजना राबविण्यात येईल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा उतरवण्याची अंतिम तारीख ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, बागायती गव्हासाठी व हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा.

- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT