Kolhapur News : राज्यात एक रुपयात पीक विमा काढण्याचे काम सुरू आहे. पीक विमा योजनेचा आज अखेरचा दिवस आहे. दरम्यान जिल्ह्यातील २० हजार ३१ खातेदार शेतकऱ्यांनी ३९ हजार ८२४ अर्जांद्वारे ११ हजार ३३२ हेक्टरमधील पिकांवर पिक विमा उतरविला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यात ५ हजार ६६६ सहभागी शेतकऱ्यांच्या ४ हजार १५३ हेक्टरमधील पिकांचा समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाकडून आज विमा उतरवण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, राधानगरी तालुक्यातून सर्वाधिक २८८७ तर भुदरगड तालुक्यातील सर्वात कमी ६३० शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे.
यंदा राज्य शासनाने विम्याचा हप्ता शेतकऱ्यांवर न लादता केवळ एक रुपयात विमा उतरवण्याची घोषणा केली. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होतील अशी अपेक्षा होती. यंदाचा पाऊसमान लहरी असला तरीसुद्धा त्या तुलनेत विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे.
एक जुलै पासून पीक भरण्याची कार्यवाही सुरू झाली. पहिल्या टप्प्यात अगदी अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कृषी विभागाने विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यत ही योजना पोहचवली. परिणामी शेवटच्या पंधरावड्यात विमा उतरवण्याला गती आली. जिल्ह्यातील एकूण खातेदारांपैकी विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांची संख्या तशी नगण्य असली तरी दरवर्षीच्या तुलनेत ती अधिकच आहे.
एक रुपयात विमा उतरवण्याची शासनाची घोषणा असली तरी विविध ऑनलाईन सेंटरमधून शेतकऱ्यांची लूट करण्याचे प्रकारही वाढले. फॉर्म भरणे, कागदपत्र अपलोड करण्यासाठी काही सेंटरमधून २०० ते ३०० रुपये शेतकऱ्यांकडून वसूल केले गेले. यामुळे एक रुपयात पिक विमा केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.
यावर्षी मुळात उशिरा दाखल झालेल्या पावसाने पेरण्या लांबल्या. जुलैमधील शेवटच्या पंधरावड्यात पावसाने दमदार सलामी दिली. यामुळे पिकांची उगवण चांगली आहे. पेरण्या उशिरा झाल्याने मळणी हंगामही लांबणार आहे.
त्यातच आता पावसाने उघडीप दिली आहे. आवश्यक इतका पाऊस झाला नाही तर भात पिक अधिकाधिक धोक्यात येवू शकते. हा सारासार विचार करुन काही शेतकरी पिक विमा उतरवण्यासाठी पुढे आले. ३१ जुलैपर्यंत मुदत होती. परंतु शासनाने पुन्हा ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.