Agriculture News : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांमागे पाणी हेच मुख्य कारण होते. जर शेतपिकांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असते तर शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले नसते. तसेच इथेनॉलमुळे साखर उद्योग टिकून राहिला आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी म्हटले. त्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाची गरज असल्याचेही नमूद केले. पुण्यात नाम फाउंडेशन आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते..शेतीसाठी पाण्याची टंचाई हेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे कारण असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी गडकरी यांनी, अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने जलसंवर्धन आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी केलेल्या कल्याणकारी कामाचे कौतुक केले..Agriculture Investment : शेतीसाठीची गुंतवणूक आणि निविष्ठा अनुदान.यावेळी त्यांनी बोलताना साखर उद्योग क्षेत्रात इथेनॉलची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, "आपण २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो. आज, इथेनॉलमुळेच ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार टिकून राहता आले आहे. भारतात साखरेचा अतिरिक्त साठा आहे आणि इथेनॉलमुळेच साखर कारखाने टिकून राहिले आहेत.".शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी अनेक प्रयोग सुरू असल्याचेही ते म्हणाले. शेतीमधील तंत्रज्ञान ग्रामीण जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले..या महिन्याच्या सुरुवातीला, काँग्रेसने गडकरी यांच्यावर आरोप करत म्हटले होते की त्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी आक्रमक भूमिका घेत लॉबिंग केले. तर त्यांच्या मुलांचा अशा इथेनॉल कंपन्यांशी संबध होता; ज्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आर्थिकदृष्ट्या फायद्यात आल्या.दरम्यान, भाजपने हे आरोप फेटाळून लावत म्हटले की, काँग्रेसने आम आदमी पक्षासारखेच बिनबुडाचे आरोप केले..Agricultural Trade : भारत १४० कोटी लोकांचा देश तरीही आमच्याकडून एक पोत मका घेत नाही?; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा सवाल.संपूर्ण देशात २० टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल लागू करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. याबाबतची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर इथेनॉलवरुन वादाला तोंड फुटले. अशाप्रकारचे इंधन अनेक वाहनांसाठी योग्य नाही, तरीही वाहनचालकांना ते वापरण्याची सक्ती केली जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता..इथेनॉल धोरणाचा साखर कारखान्यांना कसा फायदा झाला?भारताच्या इथेनॉल धोरणाने उसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन मिळाले. यामुळे साखर उद्योगात मोठा बदल घडून आला. या बदलामुळे साखर कारखान्यांना एक फायदेशीर पर्याय मिळाला. तसेच यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वततेत योगदान मिळाले.देशातील ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि ५ लाख कामगार या उद्योगाशी जोडलेले आहेत. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे.इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योगाला आर्थिक स्थिरता मिळाली. यामुळे साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळाला. तसेच साखरेच्या दरांवरील अवलंबित्व कमी झाले. जे दर अनेवेळा अस्थिर असतात. इथेनॉलचा पुरवठा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जवळपास ६७० कोटी लिटरवर गेला. ही आकडेवारी एकूण साखर उत्पादनाच्या सुमारे ९ टक्के एवढी आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आर्थिक वर्ष २०१५ पासून शेतकऱ्यांना सुमारे १.२० लाख कोटी रुपये दिले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.