गौरी मांजरेकरRelationships in the Digital Age: आजच्या डिजिटल युगात समाजमाध्यमे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. मित्र-मैत्रीणींशी संवाद साधणे, माहिती मिळविणे आणि मनोरंजन करणे यासाठी लोक समाजमाध्यमांवर आपल्या जगण्यातील अधिकांश वेळ घालवितात. मात्र, समाजमाध्यमांच्या अतिरेकामुळे नात्यांमध्ये गैरसमज, अविश्वास, आणि मानसिक तणाव निर्माण होऊन घटस्फोटांच्या वाढत्या प्रकरणांमुळे ही एक सामाजिक समस्या म्हणून उदयास आली आहे..घटस्फोटांची कारणे१. तुलनात्मक मानसिकता समाजमाध्यमांवर आपण सतत इतर जोडप्यांच्या ‘आनंदी जीवनातील क्षण’ पाहतो. सहली, आकर्षक पद्धतीने साजरे केले गेलेले सण, रोमँटिक डिनर इत्यादी अनेक उत्तम क्षण जेव्हा शेअर केले जातात, तेव्हा दुसऱ्याच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण पाहून त्यांना आपल्या जगण्यात काहीतरी कमी आहे, असे त्या व्यक्तीला वाटायला लागते. जीवनसाथीबद्दल नाराजी, असमाधान आणि अपेक्षाभंग वाटायला लागतो. अशा प्रकारच्या तुलनांमुळे वाद होतात..२. भावनिक दुर्लक्ष एकाच खोलीत असले तरी दोघेही मनाने खूप दूर असू शकतात. याचे कारण दोघेही मोबाईलवर असतात. दोघांत कुठलाच संवाद नाही, शारीरिक जवळीक नाही, फक्त डिजिटल व्यग्रता. यामुळे भावनिक ओलावा संपून जातो..३. विश्वासघात समाजमाध्यमांवर जुन्या मित्र-मैत्रिणींशी जुने संबंध पुन्हा प्रस्थापित होणे किंवा नवीन विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करणे सोपे झाले आहे. चॅटिंग ऍप्स, डेटिंग साईट्स आणि इतर समाजमाध्यम प्लॅटफॉर्ममुळे असे संबंध लपविणे शक्य झाले आहे, ज्यांमुळे विश्वासघात आणि घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे..Ganesh Festival Social Media : गणेशोत्सवातील सोशल मीडियाची भूमिका.४. संवादाचा अभावपूर्वी संवाद हा प्रत्यक्ष भेटींतून,पत्राद्वारे किंवा फोनवरून होत असे. आता मेसेज,चॅट, स्टेटस, व्हॉट्सअप कॉल्स किंवा व्हिडिओ कॉल्स यांचा वापर वाढला आहे. या माध्यमांची सहज सुविधा चांगली आहे; पण गैरसमज, मेसेजचे किंवा चॅटचे चुकीचे संदर्भ आणि या गोष्टी व्हॉट्सअप ग्रुप्सवर सहजपणे पाठविल्या जातात. वास्तविक वैयक्तिक संवादाऐवजी समाजमाध्यमांवर वाढलेल्या संपर्काने आपल्या जीवनसाथीबद्दलचे गैरसमज, अविश्वास व असमाधान वैवाहिक आयुष्यात वाढीस लागले आहे..५. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सीमारेषाआजच्या जोडीदारांना वैयक्तिक अवकाश आणि स्वातंत्र्य आवश्यक असते. समाजमाध्यमांवर मुक्तपणे व्यक्त होण्याची मुभा असते,परंतु जर ही व्यक्ती आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याची मर्यादा ओलांडीत असेल तर त्यामुळे जोडीदारीबरोबर असलेल्या संबंधावर ताण येऊ शकतो..वैवाहिक नात्यांवर होणारे परिणामघटस्फोटामुळे कुटुंब विखरले जाते. त्याचा सर्वांत मोठा फटका मुलांना बसतो. त्यांना दोन्ही पालकांचे प्रेम आणि मार्गदर्शन मिळत नाही, त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. नातेवाईकांच्या दबावाऐवजी आज जोडपी स्वतः निर्णय घेतात. ही चांगली गोष्ट आहे. पण, कधी ‘घटस्फोट’ हा सहज निर्णय वाटायला लागतो. पटले नाही तर घ्या घटस्फोट अशी परिस्थिती निर्माण होते. समाजमाध्यमांवरील घटस्फोटाच्या चर्चांमुळे नात्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होते. .Geopathic Stress : जिओपॅथिक स्ट्रेसचे अवयवांवरील परिणामजिओपॅथिक स्ट्रेसचे अवयवांवरील परिणाम.यामुळे अनेकांचा लग्न या संस्थेवरील विश्वास उडाला असून आजच्या समाजात अविवाहित व्यक्तींचे प्रमाण वाढले आहे. घटस्फोटाची प्रक्रिया तणावपूर्ण असते. समाजमाध्यमांवरील नकारात्मक प्रतिक्रिया आणि चर्चा यांमुळे मानसिक ताण वाढतो. त्यामुळे व्यक्ती नैराश्य, चिंता इतर मानसिक समस्यांनी ग्रासली जाते. महिलांमध्ये आत्मग्लानी, न्यूनगंड आणि आर्थिक सुरक्षिततेची भीती निर्माण होते. तर, पुरुषांमध्ये उदासीनता तसेच राग अथवा व्यसनांच्या आहारी जाण्याकडे कल होतो. मुलांवर मानसिक दबाव येतो..कायदेशीर प्रक्रियेचा खर्चघटस्फोटाची प्रक्रिया खूप खर्चिक असते. वकिलांची फी,न्यायालयाचा खर्च, मालमत्तेची विभागणी यांमुळे आर्थिक ताण वाढतो. पालनखर्च आणि एकाच व्यक्तीकडे मुलाची जबाबदारी आल्यामुळे त्या व्यक्तीवर मानसिक, आर्थिक तसेच शैक्षणिक भार पडून एकल पालकत्वाने त्या व्यक्तीच्या आयुष्यातील संतुलन बिघडू शकते. नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल १०हजार ११५ घटस्फोट समाजमाध्यमांचा अतिवापरातून झाले आहेत. .मुंबईतील ‘कुटुंब’ न्यायालयातील वकिलांच्या मते व्हॉट्सअप, फेसबुक चॅटिंग, मेसेज इत्यादींचा चुकीचा वापर अनेकदा घटस्फोटाची ‘बीजस्थळे’ असतात. समाजमाध्यमातील आक्षेपार्ह बाबी घटस्फोटासाठी प्रमाणित करण्यासाठी मेसेजेस, चॅट इतिहास, फोटो व व्हिडीओ यांचा विचार केला जातो. न्यायालयात याची पडताळणी, गोपनीयतेचे अधिकार व फसवणुकीचा धोका यांवर विचार केला जातो..उपायपती-पत्नीने एकमेकांशी चर्चा करून समाज माध्यमांच्या वापरासाठी निश्चित सीमारेषा ठरवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ,जेवणाच्या वेळी मोबाईलचा वापर टाळावा. एकत्र वेळ घालवावा तसेच समाजमाध्यमांवर कुठल्या गोष्टी शेअर कराव्यात हे ठरवावे. नात्यांमधील खासगी माहिती उघड करू नये. प्रत्येक आठवड्यात एक दिवस मोबाईल बाजूला ठेवून फक्त एकमेकांशी संवाद साधा..विवाह समुपदेशकाची मदत घ्या. कारण ते निष्पक्ष ऐकतात आणि वैवाहिक आयुष्यात संवाद साधण्याचे वेगवेगळे मार्ग सुचवितात.'सोशल मीडिया डिटॉक्स' आठवड्यातून एकदा करा. महिन्यातून एक रविवार मोबाइलशिवाय घालवा. त्यामुळे जोडीदारासोबतचे 'नाते' नव्याने प्रस्थापित होते..मुलांसोबत स्पष्ट पण संवेदनशील संवाद साधा. जर घटस्फोट अनिर्वाय असेल ,तर मुलाला योग्य वयात हे समजावून सांगणे गरजेचे आहे- की दोघेही पालक आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करतात आणि त्याचे भविष्य हे सुरक्षित करण्यासाठी दोघेही वचनबद्ध आहेत.व्यक्तीच्या सभोवतीच्या समाजाने वैचारिक परिपक्क्ता दाखवीत घटस्फोटित पालकांच्या मुलाला/मुलांना याविषयी सतत प्रश्न विचारून व्यथित न करण्याचे भान ठेवावे. तसेच,व्यक्तीच्या कुटुंबाने घटस्फोटाच्या निर्णयाचा मान ठेऊन मुलांच्या संगोपनात त्या व्यक्तीची सकारात्मक वर्तनाने व विचारांनी मदत करावी, ही अपेक्षा ठेवली जाऊ शकते.(लेखिका डिजिटल मार्केटिंग व सोशल मीडिया मानसशास्त्र विषयाच्या अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.