Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचमाने तातडीने करा ः पालकमंत्री पाटील

पुणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

टीम ॲग्रोवन

पुणे ः जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीसदृश (Heavy Rain) पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. १५) विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील विकासकामे वेगाने मार्गी लावायची असून, निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अधिकाधिक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासकीय निधीसोबतच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही सहकार्य घेण्यात येईल. पशुसंवर्धन विभागाने लम्पी स्कीन आजार नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. शिरूर परिसरात बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीती असल्याने बिबट्या पकडण्यासाठी अधिकचे पिंजरे लावावेत आणि तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी निवडक स्थळ घेऊन तेथील विकासाचे नियोजन करावे, जेणेकरून अशा ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकेल. आगामी काळातील रोजगार कौशल्याधारित असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात यावा. त्यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा सादर केला. विविध विभागांच्या खातेप्रमुखांनीही आपापल्या विभागांची माहिती सादर केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT