Crop Damage Akola Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अकोला जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

शुक्रवारी (ता. ७) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या सुमारे पाच हजार २४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Akola Crop Damage News जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ७) झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीमुळे (Hailstorm) झालेल्या सुमारे पाच हजार २४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. गहू, कांदा, कलिंगड, पपई, भाजीपाला व लिंबू या पिकांचे नुकसान झाले आहे.

तर लोणाग्रा (ता.अकोला) येथे एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला असून जिल्ह्यातील १६ जनावरे दगावली. तसेच ४६ घरांचेही नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार बार्शीटाकळी तालुक्यात १९९ हेक्टर, पातूर तालुक्यात ३०२५.९७ हेक्टर, अकोला तालुक्यात ७२५ हेक्टर, मूर्तिजापूर तालुक्यात ५२ हेक्टर व बाळापूर तालुक्यात १२४१ हेक्टर असे एकूण ५ हजार २४२.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

गहू, कांदा, कलिंगड, पपई,भाजीपाला व लिंबू या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अकोला तालुक्यात लोणाग्रा येथे पुंडा पंढरी माने (वय ३५) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. तर, अकोला तालुक्यातील १४ लहान जनावरे व बाळापूर तालुक्यातील २ मोठे जनावरे वीज पडून दगावली.

बार्शीटाकळी तालुक्यातील ३ घरे, पातूर येथील १२, अकोला येथील २, मूर्तिजापूर येथील २६ व बाळापूर येथील दोन घरांचे अंशतः तर मूर्तिजापूर तालुक्यातील एका घराचे पूर्णतः: नुकसान झाले. जिल्ह्यातील इतर तालुक्याचे नुकसानीचा अहवाल निरंक असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: मावळात सर्वाधिक २०९ टक्के पाऊस

Farming Issue: गणपतीच्या देखाव्यात ‘लढा कांदा शेतीचा’

Maratha Reservation: मुंबईतील रस्ते रिकामे करा, परिस्थिती सामान्य करा

Mumbai APMC: मंबई बाजार समितीवर अखेर प्रशासक

Onion Procurement Corruption: कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करून श्वेतपत्रिका काढा : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT