Crop Damage
Crop Damage Agrwon

Crop Damage : पुणे जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान

पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.८) सकाळी आणि शुक्रवारी (ता.७) सायंकाळी विविध ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
Published on

Pune News जिल्ह्यात शनिवारी (ता.८) सकाळी आणि शुक्रवारी (ता.७) सायंकाळी विविध ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Pune rainfall) झाला. पावसामुळे ज्वारी, बाजरीसह आंबा, कांदा भाजीपाल्याचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

शनिवारी (ता.८) सकाळी खडकवासला परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे परिसरातील आंबा पिकाला फटका बसला आहे.

नुकतेच गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोहोरासह लहान कैऱ्यांची गळ झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातच शनिवारच्या पावसाने देखील आंबा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्‍ह्यात कडूस (ता.खेड) परिसराला शुक्रवारी (ता.७) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपले. वादळामुळे शेतातील हाताशी आलेले बाजरी, गहू पिकांचे नुकसान आले. परिसरात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने विजांच्या गडगडाटात हजेरी लावली. सुमारे अर्धातास टपोऱ्या थेंबांच्या पावसाचा शिडकावा झाला.

यामुळे शेतातील बाजरी, गहू, मका, कांदा व आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी फुलोऱ्यात आलेले बाजरीचे व गव्हाचे पीक भिजले. तसेच शेतातच अरण लावून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले.

कांद्याच्या अरणीवर आच्छादन टाकताना शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. काहीकाळ परिसरातील वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला होता. कैऱ्यांची मोठ्या प्रमाणात गळ झाली.

Crop Damage
Crop Damage In Marathwada : वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने बाजरी आडवी

शुक्रवारी (ता.७) रात्री चाकण व परिसरातील गावात हलक्या स्वरूपात पाऊस आला. तसेच, पावसामुळे शहरात फेरीवाल्यांची, पथारीवाल्यांची तसेच पादचाऱ्यांची, दुचाकीस्वारांची पळापळ झाली.

हा पाऊस काढणी केलेल्या कांद्याला मात्र मारक आहे. येथील महात्मा फुले बाजारातही विक्रीसाठी आणलेला शेतकऱ्यांचा कांदा काही प्रमाणात भिजला. प्लॅस्टिक कागद, ताडपत्रीने झाकून ठेवलेला कांदा शाबूत राहिला.

कांदा ठेवण्यासाठी निवाऱ्याची सोय नसल्याने शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा सुमारे दोन हजार पिशव्यांवर कांदा भिजत असल्याचे विक्रम शिंदे यांनी सांगितले.

Crop Damage
Mango Crop Damage : उन्हाचा चटका हापूसला फटका

आंबेगाव तालुक्यातील मंचर शहर, अवसरी खुर्द, भोरवाडी, तांबडे मळा परिसरात शुक्रवारी संध्याकाळी व पुन्हा रात्री साडेसातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.

शेतात तोडणी झालेल्या कांद्याच्या ढिगावर ताडपत्री टाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. आकाशात ढग भरून आले होते.

दुपारपासून उकाडा जाणवत होता. संध्याकाळी पाऊस झाला व पुन्हा ही पावसाने हजेरी लावली. मंचर शहरात रस्त्याच्या दुतर्फा विविध साहित्यांची विक्री करणारे कपडे विक्रेते व फळ विक्रेत्यांची धावपळ झाली.

पावसामुळे ग्राहकांची वर्दळ थांबल्याने विक्रेत्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला. पावसानंतर हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने असाह्य झालेल्यांना दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com