Water Shortage
Water Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : कळंबीत ६०० एकरावरील पिके करपली

Team Agrowon

Water Shortage Sangli : सध्या ‘टेंभू’च्या पाण्याचे आवर्तन (Tembhu Irrigation) सुरू आहे. मात्र खानापूर तालुक्यातील गांधीनगरहून बंदिस्त जलवाहिनीमधून जाणाऱ्या टेंभूच्या पाण्याच्या लाभक्षेत्रातील कळंबी हे गाव मात्र पाण्यापासून वंचित आहे.

याकडे टेंभूचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पाण्याअभावी सुमारे सहाशे एकरातील पिके करपू (Crop Damage) लागली आहेत.

विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

तातडीने कळंबी लाभक्षेत्रात पाणी सोडून शेती, लोकांचे, जनावरांचे पिण्याच्या पाण्याअभावी होणारे हाल टाळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

गांधीनगर (विटा) येथून बंदिस्त पाईपलाईनमधून गांधीनगर, कार्वे, चंद्रसेननगर, भवानीनगर, शिदेमळा, खंबाळे व शेवटी कळंबी गावाला पाणी सोडले जाते. मात्र मागील गावातील गावकरी कळंबी गावाला पाणी येऊ देईनात.

ते कळंबीकडे जाणाऱ्या पाईपलाईनचे जागोजागी असणारे व्हॉल्व बंद करून पाणीप्रवाह पुन्हा पुन्हा खंडित करून आपापल्या शेतीकडे पाणी वळवत आहेत. त्यामुळे गावातील शेतीच्या पाण्यासह जनावरे, लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

त्यातच कळंबी हद्दीतील सुमारे सहाशे ते सातशे एकर ऊस व अन्य बागायती पिकांचे क्षेत्र कळंबी पाझर तलावावर अवलंबून असते आणि सद्यःस्थितीत तलाव कोरडा ठाक पडल्याने आसपासच्या विहिरींनी तळ गाठला आहे.

त्याचबरोबर तलावात पाणी सोडण्यासाठी बसविलेली पाईप तलावाच्या आकारमानाच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे. त्यामुळे कळंबी हद्दीतील तलावात पाणी सोडण्यासाठी दीड ते दोन फुटी आकाराच्या पाईपलाईनची गरज आहे.

त्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाणी कळंबीपर्यंत येत नसल्याच्या तक्रारी करुनसुद्धा अधिकारी अन्य गावांना पाणी वाटपात झुकते माप देत आहेत आणि कळंबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT