Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage News : ‘अस्मानी संकटामुळे होत्याचं नव्हतं झालं’

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात सटाणा तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने मोठा दणका दिला आहे. त्यामुळे जुनी शेमळी, ब्राह्मणगाव, लखमापूर, नवी शेमळी, आराई, नागझरी, किरायतवाडी, कॅनॉल चौफुली, धांद्री आदी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या ‘‘अस्मानी संकटामुळे मोठा फटका बसल्याने काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं’’ अशा शब्दात शेतकरी व्यक्त होत आहे.

वादळी वारा, पाऊस व गारपिटीने डाळिंब, भाजीपाला अशा पिकांचे मोठे नुकसान आहे. तर वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळीवरील ताडपत्री उडून गेल्याने उन्हाळ कांदा पावसात भिजल्याने नुकसान वाढले आहे. या भागात ८० ते ९० खांब आणि ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर शेळ्या, गायी मृत्यूमुखी पडल्या असून, अनेक ठिकाणी शेतातील झाडेही उन्मळून पडले आहेत.

जुनी शेमळी येथील प्रशांत बच्छाव यांच्या गोठ्याचे आणि डाळिंब बागेचे, भाऊसाहेब बच्छाव यांच्या घरावरील पत्रे उडून भिंती खचल्या. या वेळी जीवितहानी टळली मात्र मोठे नुकसान झाले आहे. सुरतीराम शेलार यांच्या दीड एकर डाळिंबाचे नुकसान झाले असून रत्नाकर बच्छाव यांची कांदाचाळ उद्ध्वस्त होऊन सर्व कांदे ओले झाले आहेत.

राजेंद्र खैरनार यांची गाय मृत्यूमुखी पडली असून तर गोरख शेलार यांच्या घरावरील पत्रे उडाले. वसंत खैरनार यांची पाचटाची झोपडी उडाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. नवी शेमळी येथील बाबूलाल गायकवाड यांच्या घरावरील पत्रे दूरवर उडाले.

या वेळी तलाठी श्री. बाविस्कर, दीपक मोटे, कृषी सहायक कापडणीस, ग्रामसेवक चेतन काथेपुरी काथेपुरी, तेजस वाघ, संदीप बधान आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आजी माजी आमदारांकडून नुकसानीची पाहणी

बुधवारी (ता. २४) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी या भागातील नुकसानीची पाहणी करून शेतकरी ग्रामस्थांचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावा, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तत्काळ आर्थिक मदत व शिधा पुरवठा करण्याच्या सूचना आमदार बोरसे यांनी या वेळी उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांना दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT