Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : परतीच्या पावसाचे तळोदा तालुक्यास झोडपले

तालुक्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने थैमान घातले असून, चिनोदा, रांझणी, प्रतापपूर, तळवे, मोरवड आदी गावांतील शेतकऱ्यांचे केळी, कापूस, पपई, सोयाबीन, उसाचे नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

तळोदा, जि. नंदुरबार : तालुक्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने (Monsoon Return Rain) थैमान घातले असून, चिनोदा, रांझणी, प्रतापपूर, तळवे, मोरवड आदी गावांतील शेतकऱ्यांचे केळी, कापूस (Cotton Crop Damage), पपई, सोयाबीन (Soybean Crop Damage), उसाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीचा पावसाने हिरावून नेल्याच्या भीतीने तळोदा शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत होता.

कधी पहाटे धुके, तर कधी दुपारी कडक उन्हाच्या तडाखा बसत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तळोदा शहराला व तालुक्याला परतीचा पावसाच्या जोरदार तडाखा बसला आहे. मंगळवारी (ता. ११) तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाला तर बुधवारी (ता. १२)देखील पावसाने जोरदार हजेरी लावली.

पावसाच्या या तडाख्याने नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापसाची बोंडे परिपक्व होऊन काही दिवसांवर कापूस वेचणीला येऊन ठेपला असताना, अचानक आलेल्या परतीच्या पावसाने कापसाची बोंडे गळून पडली आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळीचे वृक्ष उन्मळून पडली आहेत. काढणीवर आलेल्या सोयाबीनला देखील मोठा फटका बसला आहे. शेत-शिवारात सध्या पाणी साचल्याने शिवारात जाणेही कठीण झाले आहे.

चिनोदा-प्रतापपूर रस्त्यावर झाडे उन्मळले

वादळी पावसामुळे चिनोदा ते प्रतापपूरदरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी चिनोदा येथील शेतकरी गणेश मराठे व गावातील तरुणांनी पुढाकार घेत रस्त्यावरील झाडे बाजूला सारून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

परतीचा पावसामुळे शेतातील कापूस व केळीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करीत त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावेत.
प्रशांत मराठे, शेतकरी, चिनोदा (ता. तळोदा, जि. नंदुरबार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

Quality Rose Production: दर्जेदार गुलाब उत्पादन हेच ध्येय...

Weekly Weather: किमान तापमानात घट सुरू; सकाळी थंड हवामान

SCROLL FOR NEXT