Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अकोट, तेल्हारा तालुक्यांत अतिवृष्टी, पुरामुळे मोठे नुकसान

पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन तसेच वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. १० व ११ ऑगस्टला अकोट, तेल्हारा तालुक्यात अकोलखेड, उमरा, अडगाव व इतर मंडलामध्ये नुकसान झालेले आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात १० व ११ ऑक्टोबरला अकोट आणि तेल्हारा तालुक्यांत काही मंडलांमध्ये पावसाने (Heavy Rain) धूळधाण उडवून दिली. या पावसाने पिकांचे नुकसान (Crop Damage) तर झालेच शिवाय जमीनही खरडून (Agriculture Land Wash Away) गेल्यामुळे सर्वाधिक फटका बसला. या नुकसानीचा कृषी, महसूल यंत्रणांकडून अंदाज घेतला जात असून, हजारो हेक्टरचे नुकसान (Crop Loss) असल्याचे सांगितले जाते.

पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन तसेच वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. १० व ११ ऑगस्टला अकोट, तेल्हारा तालुक्यात अकोलखेड, उमरा, अडगाव व इतर मंडलामध्ये नुकसान झालेले आहे. तेल्हारा अडगाव बुद्रुक मंडलात ७९४, तर हिवरखेडमध्ये ६१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

अकोट तालुक्यात उमरा, अकोलखेड मंडलांमध्ये प्रचंड नुकसान आहे. याचा अंदाज प्रशासनाकडून घेतला जात आहे. बोर्डी, शिवपूर कासोद मौज्यामध्येच ५०० हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आडगाव परिसरात मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काही काळ गावाचा संपर्कसुद्धा तुटला होता. विद्रुपा नदीला पूर आल्याने कित्येक वर्षांनंतर गावाचा पाच तास संपर्क तुटला.

या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेले सोयाबीन जमीनदोस्त झाले. कपाशीच्या पिकातून पाणी वाहल्याने शेती खरडून गेली. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांना विमा कंपनीने मदत करावी तसेच झालेल्या नुकसानीबाबत मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

या दोन्ही तालुक्यांत अतिवृष्टी, पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. मंगळवारी (ता. ११) पाहणी केली तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून आता दगड तेवढे येऊन पडले आहेत. अनेक वर्षे हे नुकसान भरून निघणार नाही. शेतकरी दुहेरी संकटाने घेरला आहे. यंत्रणांनी तातडीने पंचनामे करून दिवाळीपूर्वी मदत द्यायला हवी.
लक्ष्मीकांत कौठकर, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT