Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पाऊस पाठ सोडेना, नुकसानही थांबेना

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा, पण जोरदार हजेरी लावून खरीप पिकांचे (Kharip crop) आधीच मोठे नुकसान (Crop Damage) केले. त्याचे पंचनामे, मदतीचे वाटप अशी प्रक्रिया अद्यापही सरूच असताना, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा (Rainfall) जोर गुरुवारी (ता. १३) काहीसा ओसरला. पण आजही अनेक भागांत कधी ऊन, कधी ढगाळ, तर कधी पाऊस असे वातावरण राहिले.

गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अनेक भागांत पाऊस पडतो आहे. काही भागांत दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सध्या खरिपातील सोयाबीनची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी काढून ठेवलेले सोयाबीन शिवारातच आहे.

या सर्व कामाला या पावसाचा फटका बसतो आहे. या आधीच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने मोठा फटका पिकांना बसला आहे. त्या वेळी तब्बल ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान बार्शी तालुक्यात झाले आहे. त्यानंतर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, करमाळा, माढ्यात झाले आहे.

प्रामुख्याने सोयाबीन, मकासह द्राक्ष, सीताफळ, लिंबू या फळबागांना त्याचा मोठा फटका बसला. एकट्या बार्शीत या दोन दिवसांत ४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे बार्शीसह माढा, करमाळा, अक्कलकोट भागांत पावसाचे नुकसान सरूच आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ४४५ मिलिमीटर आहे. पण प्रत्यक्षात आतापर्यंत ६११.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पंचनाम्याचे आदेश

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून बहुतांश भागात थांबून-थांबून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतीकामात अडचण येते आहेच. पण सतत पाऊस होत नसल्याने नुकसानीचे प्रमाणही वाढत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाच्या या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश आता प्रशासनाने दिले आहेत, असे सांगण्यात आले.

‘उजनी’तून ‘भीमे’तील विसर्ग कायम

एकीकडे पावसाची ही परिस्थिती असताना, उजनी धरणाकडे वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता.१३) कायम राहिला. उजनी धरणाची पाणीपातळी त्यामुळे किरकोळ चढ-उतार वगळता स्थिर राहिली. धरणात एकूण पाणीपातळी ४९७.२२० मीटरपर्यंत राहिली.

तर एकूण पाणीसाठा १२१.९३ टीएमसी, तर उपयुक्त साठा ५८.२७ टीएमसी एवढा राहिला आणि या पाण्याची टक्केवारी १०८.७६ टक्के राहिली. दौंडकडून गुरुवारी उजनीमध्ये १० हजार ८१३ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग मिसळत होता. तर उजनी धरणातून पुढे भीमा नदीत कालच्या प्रमाणेच आजही २० हजार क्युसेक इतका विसर्ग कायम होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भावावरील दबाव कायम; कापूस, सोयाबीन, तूर तसेच कांदा यांचे बाजारभाव काय आहेत ?

Sugar Production : साखर उत्पादन वाढले पाच लाख टनांनी, उतारा मात्र घटला

Electricity Issue : नियमित विजेची नागरिकांची मागणी

Soybean Seed Processing : सोयाबीन बीज प्रक्रियेवर जोर

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

SCROLL FOR NEXT