Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : गारपिटीच्या दणक्याने पुण्यातील शेतकरी हतबल

गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाचा दणका सुरूच आहे. शनिवारी (ता.१५) सायंकाळी जिल्ह्यातील शिरूर, हवेली, इंदापूर, दौंड, आंबेगाव, भोर, वेल्हा, मुळशी या भागांत जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Pune Unseasonal News : गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) दणका सुरूच आहे. शनिवारी (ता.१५) सायंकाळी जिल्ह्यातील शिरूर, हवेली, इंदापूर, दौंड, आंबेगाव, भोर, वेल्हा, मुळशी या भागांत जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

तर हवेलीतील कात्रज, आंबेगावमधील मंचर, अवसरी खुर्द, गावडेवाडी, जांभोरी आदी ठिकाणी गारपिटीच्या दणक्याने पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले.

पुणे जिल्ह्यात माळीणमध्ये १२.५ मि.मी, तर तळेगाव ८, पाषाण ४, शिवाजीनगर भागात २.४ मिलिमीटर पाऊस पडला. तर कात्रज भागात गारांचा अक्षरश सडा पडला. दहा ते बारा ठिकाणी झाडे कोसळली. आंबेगाव तालुक्यात जांभोरी परिसरात गारपिटीने करवंदे, आंबे, हिरडा आणि चाऱ्याचे मोठे नुकसान झाले.

तर पूर्व आंबेगाव भागातील पिंपळगाव खडकी, वळती, धामणी परिसरातही नुकसान झाले. वळतीतील होळीचामाळ बिरोबा मंदिर येथील शेतकरी लक्ष्मण भोर यांच्या घरांवरील काही लोखंडी पत्रे उडाले. मंचर, अवसरी, गावडेवाडी भागात मका, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, कांदा, तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले.

शिरूरमध्ये विद्युत वाहक तारा तुटून वीजप्रवाह खंडित झाला. इंदापूर तालुक्यातील अवसरी हद्दीत संतोष नरूटे यांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोडांशी आलेले पीक वाया गेले. शासनाने पंचनामा करून तत्काळ मदत करावी, अशी मागणी संतोष नरूटे यांनी केली.

पूर्व शिरूर भागात गहू, कांद्याचे नुकसान

पूर्व शिरूर भागातील मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव, पिंपळसुटी, शिरसगाव काटा, आंधळगाव, कुरूळी आदा गावांत कांदा गहू काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. काही ठिकाणी गहू, कांद्याचे मोठे नुकसान झाले. हवेलीच्या पश्चिम भागातही शेतकरी धास्तावले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate: कृषी कर्ज मिळणार; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु, कसा अर्ज करावा?

Return Monsoon Rain: सप्टेंबरच्या शेवटी जोरदार पाऊस पडेल का ?

Pomegranate Training: सोलापुरात डाळिंब लागवड, मूल्यसाखळीवर विशेष प्रशिक्षण

Devendra Fadanvis : मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मुख्यमंत्री काय म्हणाले?

Farmers' Protest: परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुष्काळ मोर्चा

SCROLL FOR NEXT