Kharif season Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे पिकांवर संकट

Kharif Crop : मागील पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे खरीप हंगामाच्या पिकांच्या वाढीवर परिणाम झालेला आहे.

Team Agrowon

Jalna News : मागील पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे खरीप हंगामाच्या पिकांच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. तसेच रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिकांमध्ये तण, गवतांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत.

घनसावंगी तालुक्यात यंदा जून महिना कोरडा गेला. एखाद-दुसरा जोराचा पाऊस वगळता मागील पंधरा ते वीस दिवसापासून ढगाळ वातावरणाबरोबर रिमझिम सरी बरसत आहे. त्यातच कपाशीवर ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. सोयाबीन पिकात तणाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे.

त्यामुळे शेतकरी खुरपणी, मशागत करीत आहेत. शिवाय नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तणनाशकाचा वापर करावा. नत्र खताचा जास्त वापर झाला तर पिकांच्या कार्यक्षमतेत वाढ जास्त होते, त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.

त्यामुळे कपाशीला खत देतानाही कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. दरम्यान, शेतातील पिकांमध्ये रोगराईमुळे शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करत आहेत. दरम्यान, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा.

सिंचनांची सुविधा उपलब्ध शेतकऱ्यांनी ठिबक, तुषाराने पाणी देणे गरजेचे आहे. गवतांचे प्रमाण वाढल्यास आंतरमशागतीची कामे करण्याची गरज असल्याचे तालुका कृषी अधिकारी एस.एन.पवळ यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT