नाशिक : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या (Water Conservation Department) पूर्व व पश्चिम अशा दोन विभागांचे एकत्रीकरण करून एकच विभाग अस्तित्वात आल्यानंतर त्या अनुषंगाने तब्बल ३९ पदे संकटात आली असून ती पदे रद्द केली जाणार आहेत.
जलसंधारण विभागाचे राज्यात २६ जलसंधारण अधिकारी व १२७ उपविभागीय अधिकारी कार्यालये, तर जिल्हा परिषदचे ३१ जलसंधारण अधिकारी व १६८ उपविभागीय कार्यालये आहेत. राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाने कार्यालयांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायगड, नंदुरबार, परभणी, हिंगोली व भंडारा जिल्ह्यांत जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये व पदे निर्माण झाली. मात्र, नवीन जलसंधारण कार्यालय निर्माण करताना नाशिक मधील जिल्हा परिषदेच्या पूर्व-पश्चिम विभागांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन विभागांचे एकत्रीकरण करताना मात्र एकच जलसंधारण अधिकारी पद ठेवण्यात आले. नाशिक जिल्हा परिषदेत पंधरा तालुक्यांमधील १५ उपविभागीय अधिकारी कार्यालयांची संख्याही निम्म्याने घटवून सात करण्यात आली. त्यानुसार सध्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या पूर्व व पश्चिम या दोन विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची ७८ पदे मंजूर होती. त्यातील ५० टक्के पदे रिक्त होती. ३८ कर्मचारी कारभार चालवत होते. समायोजन प्रक्रियेमुळे नवीन आराखड्यात ३९ पदे मंजूर करण्यात आल्याने जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात समायोजन करण्याची गरज भासली नाही. जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्यांची ३९ पदे कायमची रद्द झाली आहेत.
जलसंधारण उपविभागाची मुख्यालये
उपविभाग... तालुका कार्यक्षेत्र
जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, मालेगाव...मालेगाव, नांदगाव
जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, येवला...येवला, निफाड
जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, दिंडोरी...दिंडोरी, पेठ
जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, कळवण...कळवण, सुरगाणा
जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, इगतपुरी...इगतपुरी, त्र्यंबकेश्वर (हरसूल)
जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, सटाणा...सटाणा, देवळा, चांदवड.
जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, नाशिक...नाशिक, सिन्नर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.