Sugarcane  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing Season : केवळ २०० ऊसतोड मुकादमांवर गुन्हे दाखल

Sugar Season Update : गेल्या काही वर्षांपासून ऊस तोड मुकादमांनी राज्यातील शेतकरी आणि वाहनचालकांची चालविलेली लूट आणि फसवणुकीबाबत पावले उचलली असली तर केवळ २०० गुन्हे दाखल झाले आहेत.

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

Mumbai News : गेल्या काही वर्षांपासून ऊस तोड मुकादमांनी राज्यातील शेतकरी आणि वाहनचालकांची चालविलेली लूट आणि फसवणुकीबाबत पावले उचलली असली तर केवळ २०० गुन्हे दाखल झाले आहेत. वास्तविक १० हजार ७१९ कारखाने, वाहनचालकांची फसवणूक करण्यात आली आहे.

राज्यातील ऊसतोड मुकादमांनी आगावू रक्कम घेऊन ऊसतोडणी करण्यास नकार देत पलायन केल्याने अनेक वाहनचालक अडचणीत आले आहेत. या मुकादमांनी ५ कोटी, ७१ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केली असून या प्रकरणी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

राज्यातील ऊस तोडणीसाठी सध्या मजुरांची संख्या खूपच कमी आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी कारखाने मुकादमांशी करार करतात तर काही वाहनचालक आपल्या वाहनांसाठी करार करून एका मजुराच्या जोडप्यामागे काही ठराविक रक्कम देतात.

ही प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू होते. मुकादम करार करत असताना काही रक्कम आगावू घेतात. मात्र, एक मुकादम एकापेक्षा जास्त वाहनधारकांकडून आगावू रक्कम घेऊन फसवणूक करतात.

अनेकदा हे मुकादम मजूर घेऊन पळून जातात. त्यांना आणण्यासाठी मूळ गावी गेल्यानंतर अनेकदा मारहाण केली जाते किंवा संबंधित वाहनचालकांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल केले जातात. काहींवर जीवघेणे हल्लेही झाले आहेत. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे.

सध्या राज्यात विविध कारखान्यांकडील आकडेवारीनुसार, १० हजार ७१९ मुकादमांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांनी वाहनधारकांची तब्बल ५ कोटी २० लाख ७१ हजार रुपये बुडविले आहे. त्याची वसुली झालेली नाही. मात्र, या फसवणूक झालेल्या वाहनधारकांना कुणीही वाली नसल्याचे समोर आले आहे.

फसवणूक झालेले साखर कारखाने, संशयित मुकादम संख्या

  • तात्यासाहेब कोरे सहकारी : १७६

  • दूधगंगा वेदगंगा सहकारी : १०३

  • दत्त सहकारी : १४४

  • जवाहर सहकारी : २२०

  • इको केन एनर्जी म्हाळुंगे खालसा, चंदगड : १६९

  • सरसेनापती संताजी घोरपडे, कागल : १३८

  • राजारामबापू सहकारी, इस्लामपूर : १३८

  • हुतात्मा किसन अहीर कारखाना, वाळवा : ११०५

  • क्रांतीअग्रणी साखर कारखाना, कुंडल : १२७

  • किसन वीर सातारा कारखाना, भुईज : १६०

  • स्वराज्य इंडिया ॲग्रो : ३५२

  • शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज , फलटण : १०३

  • सोमेश्वर सहकारी : १२७

  • छत्रपती सहकारी, इंदापूर :१२९

  • विघ्नहर सहकारी, जुन्नर : ४१४

  • कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना : १४५

  • भीमा सहकारी : १५२

  • विठ्ठलराव शिंदे कारखाना, पिंपळनेर : २६१

  • बारामती ॲग्रो, कन्नड : १९२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT