Cotton Seed Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Seed Production : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणा, आंध्राची वारी

Cotton Seed : राज्य शासनाने एक जूननंतरच कापशीचे बियाणे विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यात बंदी असल्याच्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकरी तेलंगणा, आंध्र प्रदेशातून जाऊन बियाणे आणतात.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Chandrapur Cotton Seed Market : राज्य शासनाने एक जूननंतरच कापशीचे बियाणे (Cotton Seed) विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यात बंदी असल्याच्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक (Cotton Producer) शेतकरी तेलंगणा, आंध्र प्रदेशातून जाऊन बियाणे आणतात. याचा मोठा फटका दरवर्षी जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांना बसत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात धानापाठोपाठ कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जिल्ह्यात कपाशीचे लागवड क्षेत्र सरासरी एक लाख ८० हजार इतके आहे.

गेल्या काही वर्षांपासून कपाशीला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने राजुरा, कोरपना, बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, वरोरा, भद्रावती आणि चिमूर यासह अन्य काही भागांत कापसाची लागवड करण्यात येते. सिंचनाची सुविधा असलेले बहुतांश शेतकरी मे महिन्यातच कपाशीची लागवड करतात.

एक जूननंतर कापशीचे बियाणे विक्री करण्याच्या आदेशाचा मोठा फटका जिल्ह्यातील कृषी केंद्रचालकांना तीन वर्षांपासून बसत आहे. जिल्ह्यात ८५० कृषी केंद्र आहेत. दरवर्षी मोठ्या डिलर्सला मे महिन्याच्या शेवटीशेवटी कापसाचे बियाणे मिळणार.

त्यांच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या कृषी केंद्रचालकांना बियाणांचा पुरवठा करण्यात येतो. या प्रक्रियेत वेळ जातो. त्याचा परिणाम कपाशी बियाणे खरेदीसाठी दुकानांत शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळते.जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कापूस बियाण्यांसाठी आंध्र, तेलंगणात जात असल्याचा मोठा फटका कृषी केंद्र चालकांना बसत आहे.

त्यांचे ३० ते ४० नुकसान होते. दरवर्षी मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर अॅग्रो डिलर्स असोसिएशनने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले.

त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी केंद्रचालकांना कापूस बियाणे विक्रीची परवानगी आधीच द्यावी अशी मागणी केली. त्यांनी राज्यस्तरीय बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आश्वासन अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

चंद्रपुरातून खत तर आंध्रातून बियाणे
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक शेतकरी जिल्ह्यातील कृषी केंद्रातूनच उधारीवर खते, औषधांची खरेदी करतात. इकडे उधारी ठेवून खते, औषध विकत घेत असले तरी आंध्रातून नगद रक्कम देऊन कपाशीचे बियाणे खरेदी करतात.

८५० रुपये प्रती बॅग कपाशीच्या बियाण्यांची किमत आहे. आंध्र, तेलंगणातील कृषी केंद्रचालक कोणत्याही प्रकारचे बियाणे आपल्या भागातील शेतकऱ्यांना माथी मारून मोकळे होतात.

कित्येकदा तेथील बियाणे उगवत नाही. शेतकऱ्याचे नुकसान होते. त्याचा मोबदला त्यांना मिळत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती

Rain Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता

MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही

Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

NDRF Assistance Norms: एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत केंद्र सरकारकडून वाढ; आपत्तीग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT