Cotton Market  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Market : परभणीत कापसाला क्विंटलला सरासरी ७ हजार रुपये दर

Cotton Market Rate : जिल्ह्यातील मानवत, सेलू या कापसाच्या प्रमुख बाजार पेठांमधील कापूस खरेदीच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटल मागे ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील मानवत, सेलू या कापसाच्या प्रमुख बाजार पेठांमधील कापूस खरेदीच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटल मागे ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे. शनिवारी (ता.१०) सेलू बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ७१५० ते किमान ६३०५ रुपये तर सरासरी ७ हजार रुपये दर मिळाले.

केंद्र सरकारने येत्या खरीप हंगामातील कापसासाठी हमीभाव वाढ जाहीर केल्यानंतर कापूस दरात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दरात नरमाईच आहे. परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांतील कापसाच्या दरात २३ ते २६ मे या चार दिवसांत किमान दर साडेपाच हजारांपेक्षा कमी तर कमाल दर सात हजार रुपयांपेक्षा कमी होते.

२७ मे पासून दरात ५०० ते ७०० रुपयांची सुधारणा होऊन कमाल दर सात हजारांवर तर किमान दर साडेपाच ते सहा हजार रुपये राहिले. सोमवार (ता.५) पासून कापसाच्या दरात परत एकदा घसरण सुरु झाली. गुरुवारी (ता.८) सेलू बाजार समितीत क्विंटलला किमान ५५०० ते कमाल ७१८० रुपये दर मिळाले. शुक्रवारी(ता.९) किमान ६००० ते कमाल ७२२५ रुपये तर सरासरी ७१७० रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीत गुरुवारी किमान ५६०० ते कमाल ७११५ रुपये तर सरासरी ७००० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.७) कापसाची ६३५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५५०० ते कमाल ७२५५ रुपये तर सरासरी ७१०० रुपये दर मिळाले.

गेल्या आठवड्यात दरात सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस घराबाहेर काढला. त्यामुळे आवक वाढली. त्यामुळे दरात पुन्हा घट झाली आहे. खरीप पेरणीमुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक नड लक्षात घेऊन व्यापारी दर पाडून खरेदी करत आहेत. खेडा खेरदीचे दर आणि बाजार समित्यांतील दर यामध्ये ३०० ते ४०० रुपयांचा फरक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT