Kolhapur Shetkari Sangh agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Shetkari Sangh : 'शेतकरी संघ' ताब्यात घेण्याचा डाव; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कोल्हापूरकर आक्रमक

Shetkari Sahkari Sangh : शेतकरी सहकारी संघाची इमारत ताब्यात घेऊन तिथे अंबाबाईसाठी येणाऱ्या भाविकांची दर्शन रांगेसह इतर सुविधा कराव्यात असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार दिले.

sandeep Shirguppe

Kolhapur News : कोल्हापूर शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या भवानी मंडपातील शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीचे भूमिगत मजला, तळ मजला, स्टील्ट पहिला मजला तातडीने ताब्यात घेऊन तिथे अंबाबाईसाठी येणाऱ्या भाविकांची दर्शन रांगेसह इतर सुविधा कराव्यात असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिले. यावर आता शेतकरी संघातील प्रमुख नेत्यांसह कोल्हापूरकरांनी आवाज उठवला आहे.

दरम्यान शेतकरी संघाच्या अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले की, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकरी संघासोबत कोणतीही चर्चा केलेली नाही.अचानकपणे संघाची जागा ताब्यात देण्याबाबत नोटीस पाठवून दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने जागा ताब्यात घेतली, असा गंभीर आरोप देसाई यांनी केला. यासंदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे, सहकार न्यायालयातही दावा दाखल करणार आहोत, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा शेतकरी संघाच्या आजी-माजी पदाधिकारी, कर्मचारी संघटनेसह विविध पक्षांकडून निषेध करण्यात आला.

उद्या(ता.२७) सकाळी १० वाजता भवानी मंडप येथील संघाच्या मुख्य कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकरी संघात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

‘संघाची जागा बळजबरीने घेऊन कोल्हापूरचे नाक कापण्याचे काम केले जात आहे. ‘बैल’ बसला आहे, म्हणून त्याला कोणी चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यात संघाचे ४० हजार सभासद आहेत. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी चार-चार मतदार आहेत. त्यामुळे हे दोन लाख मतदार येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा अशासकीय मंडळाचे सदस्य अजितसिंह मोहिते यांनी दिला आहे.

पालकमंत्री दीपक केसरकरांची मनमानी

मध्यंतरी पालकमंत्री केसरकर यांनी मेन राजाराम हायस्कूल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न हाणून पाडला. आता शेतकरी संघ ताब्यात घेण्याचा डाव आहे. जिल्हाधिकाऱ्यांना हाताला धरून सर्व कारस्थान सुरू आहे. शिवाय केसरकर यांना मतांचा धोका नसल्याने त्यांच्या आडून सरकार कोणताही निर्णय घेत आहे. एकीकडे पालकमंत्री केसरकर जयपूरच्या धर्तीवर विकास करू म्हणतात, पण प्रत्यक्षात तसे काही दिसत नसल्याचा आरोप अशासकीय मंडळाने केला.

दरम्यान, साठ वर्षांपूर्वी बाजार मॉलची पहिली संकल्पना कोल्हापुरात राबवून शेतकरी संघ नावारूपाला आला. बघता बघता शेतकरी संघांचे जाळे राज्यभरात पसरले. शेतकरी संघाचा बैल ऐटीत उभा राहिला. पण मध्यंतरीच्या काळात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले अन् बैल रुतून बसला.

प्रशासकीय मंडळ नियुक्त झाल्यानंतर शेतकरी संघाला चांगले दिवस येऊ लागले. रुतलेला बैल पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत राज्य सरकार त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकरी संघ ताब्यात घेण्याचे कारण काय?

आपत्तीचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकरी संघाची मुख्य इमारत ताब्यात घेतली. त्यावरून कोल्हापुरात राजकारण तापू लागले आहे. हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे. त्यातच राजाराम हायस्कूल हडप करण्याचा डाव फसल्यानंतर आता शेतकरी संघ घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT