Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

मुंबईसह कोकणात पावसाची संततधार

कोकण, घाटमाथ्यावर जोर वाढणार; विदर्भातही पावसाची शक्यता

टीम ॲग्रोवन

पुणे : मॉन्सून (Monsoon) सक्रिय झाल्याने कोकण व घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भात ढगांची दाटी (Cloudy Weather) झाली आहे. मुंबईसह कोकणात सकाळपासूनच संततधार पावसाने (Continues Rain) हजेरी लावली आहे. आज (ता. २१) कोकणात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Rain Orange Alert) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मॉन्सूनने संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर कोकण, विदर्भासह राज्याच्या विविध भागांत पावसाला पोषक हवामान होत आहे. रविवारी सकाळपासूनच कोकणात पावसाची रिपरिप सुरू होती. मुंबई उपनगरात पावसाच्या सरीवर सरी येत होत्या. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे ७५ मिलिमीटर तर मुंबईतील कुलाबा येथे ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील गगनबावडा, लोणावळा, इगतपूरीमध्ये पावसाच्या मध्यम सरी पडल्या. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विदर्भातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारी सकाळपासूनच राज्यात ढगाळ हवामान होते. राज्यात उन्हाचा चटका कमी झाला आहे. मॉन्सून दाखल होऊनही अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह वाढल्याने किनारपट्टीय भागात ढगांची दाटी झाली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशापासून बांग्लादेशापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा सक्रिय आहे. छत्तीसगड पासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर पश्चिम उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : कोकण : कुलाबा ६७, डहाणू ४२, तलासरी ५३, अलिबाग ७५, खालापूर ३६, माथेरान ५२, श्रीवर्धन ६०, गुहागर ३५, हर्णे ३२, लांजा ६०, देवगड ५०, मुलदे ४४, वैभववाडी ३५, वेंगुर्ला ५५.

मध्य महाराष्ट्र : चाळीसगाव ४७, जळगाव २२, गगनबावडा २९, इगतपुरी ३४, लोणावळा ३२, सांगोला २०.

मराठवाडा : पैठण २०, माजलगाव ४१, औसा २३, तुळजापूर २३.

विदर्भ : मूर्तिजापूर २८, बटकुली २०, मेहकर २७, अमगाव ३१, अर्जूनी मोरगाव ३३, देवरी २२, गोरेगाव २७, सालकेसा २४.

मॉन्सूनची उत्तर भारतात चाल

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण पूर्व भारत व्यापून उत्तर भारतातील राज्यात प्रगती केली आहे. सोमवारी (ता. २०) संपूर्ण आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल व्यापला असून, बिहार, झारखंड, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

मंगळवारी (ता. २१) राज्यातील वादळी पावसाचा इशारा : (सौजन्य : हवामान विभाग)

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : पालघर.

मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर.

विदर्भ : यवतमाळ, चंद्रपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT