MSP Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture MSP : हमीभावात डिझेल, मजुरी दरवाढीचा विचार करा

Team Agrowon

Nagpur News : डिझेलच्या किमतीत झालेली वाढ त्यासोबतच मजुरांची उपलब्धता न होणे आणि मजुरीतील वाढीच्या परिणामी २०२४-२५ या वर्षातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी आणि ऊस या पिकांसाठी सर्वाधिक हमीभावाची शिफारस गुजरात राज्याने केली आहे.

गुरुवारी (ता. ६) गुजरातमधील गांधीनगर येथे बैठक झाली. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिव, दमण, दादरा आणि नगर हवेली ही राज्ये बैठकीत सहभागी झाली. राज्यांद्वारे शिफारशीत हमीभाव आणि त्यामागील कारणे नोंदविण्यात आली होती.

कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा, सदस्य सचिव अनुपम मित्र यांच्यासह महाराष्ट्राच्या कृषी आयुक्‍तालयातील विस्तार संचालक दिलीप झेंडे, अमरावती येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र मेटकर उपस्थित होते. गुजरातच्या वतीने रब्बी हंगामातील गव्हाकरिता ३८५० दराची शिफारस करण्यात आली आहे.

डिझेलच्या दरातील वाढ, सिंचन सुविधांवर होणारा खर्च अशा बाबी या शिफारशीमागे गृहीत धरण्यात आल्या. हरभऱ्यासाठी ६७१० रुपयांचा हमीभाव सुचविण्यात आला. शेतीकामासाठी मजूर न मिळणे आणि मजुरी दरातील वाढीच्या पार्श्‍वभूमीवर असा दर सुचविला आहे.

उसाकरिता ५५० रुपये ‘एमएसपी’ शिफारस गुजरातने केली आहे. वातावरणातील बदलामुळे उत्पादकतेवर झालेल्या परिणामाची दखल घेत दर सूचविण्यात आला आहे. मध्य प्रदेशने गव्हासाठी २४०० तर हरभऱ्याकरिता ५५०० रुपये हमीभावाची शिफारस केली.

२०२२-२३ मधील हमीभाव

गहू ः २१२५

हरभरा ः ५३३५

महाराष्ट्राने मार्केटिंग वर्ष २०२२-२३ करिता गहू ३७६९, तर हरभरा ६४२५ रुपये क्‍विंटल अशी शिफारस केली होती. केंद्राने त्या हंगामात गव्हाला २१२५, तर हरभऱ्याला ५३३५ हमीभाव दिला. शिफारशीच्या तुलनेत गव्हात १६७१, तर हरभऱ्यात १०९६ रुपयांची तफावत होती. आजच्या बैठकीनंतर पुन्हा सूचना मागविल्या आहेत. त्यानंतर रब्बीसाठी हमीभाव निश्‍चित होतील.
- दिलीप झेंडे, संचालक विस्तार, कृषी आयुक्‍तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT