Water Conclave  Agrowon
ताज्या बातम्या

Water Conservation : नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आवश्यक

नद्यांची परिसंस्था नैसर्गिकरित्या जतन करण्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी सामाजिक स्थिती, अर्थकारण आणि पर्यावरण अशा तीन अंगांनी विचार आवश्यक आहे.

Team Agrowon

Water Conclave पुणे : नैसर्गिक जलस्रोतांवर (natural Water Resources) मानवी अतिक्रमण झाल्याने समस्या उद्‌भवत आहेत. काही ठिकाणी दुष्काळग्रस्त (Drought) स्थिती, तर काही ठिकाणी पुरजन्य स्थिती निर्माण होत आहे. जगभरात पाण्याच्या संकटामुळे नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असून मानवी संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, सुनियोजित जल व्यवस्थापन, मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड हे उपाय महत्त्वाचे ठरतील, असे तज्ज्ञांनी अधोरेखित केले. ‘नद्यांच्या पुनरुज्जीवनावर धोरणात्मक उपाय’ या विषयावरील परिसंवादात तज्ज्ञांनी मते मांडली.

नद्यांची परिसंस्था नैसर्गिकरित्या जतन करण्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी सामाजिक स्थिती, अर्थकारण आणि पर्यावरण अशा तीन अंगांनी विचार आवश्यक आहे. नद्यांच्या पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन व जलसंधारणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

- संदीप सत्यमूर्ती, ‘ब्लॅक ॲण्ड व्हेच’ (अमेरिका)

नैसर्गिक जलस्रोतांच्या मूळ प्रवाहावर अतिक्रमणे झाल्याने अडचणी वाढत आहेत. भूगर्भातील पाण्याच्या उपशामुळे कॅलिफोर्नियादेखील पाण्याच्या संकटाला सामोरे जात आहे. जलस्त्रोतांच्या प्रवाहाचे क्षेत्र आणि रस्ते एकमेकांपासून वेगळे करणे आवश्यक आहे.

- मायकल फर्निस, हायड्रोलॉजिस्ट (अमेरिका)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Employment Support: मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना नोकरी; वनमंत्री गणेश नाईक यांची सभागृहात घोषणा

Maharashtra Assembly Session: मंत्रिपदासाठी नाही, मग कर्जमाफीसाठी निकष का?

Anna Hazare Protest: पाच जुलैपासून बेमुदत उपोषणाचा अण्णा हजारे यांचा इशारा

Onion Procurement Irregularities: कांदा खरेदीत मनमानीचा कळस

EL Nino: ‘एल निनो’चा देशातील १११ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका; शिवराजसिंह चौहान

SCROLL FOR NEXT