Parbhani News: परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात समाविष्ट ३४ हजार ७३३ महिला आढळल्या असून त्यापैकी सुमारे ९३ टक्के महिला विधवा आहेत. तर ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील महिलांचे प्रमाण ५२.२४ टक्क्यांहून अधिक आहे. .यापैकी सुमारे ७३.८३ टक्के महिला निरक्षर असून ५५ टक्क्यांहून अधिक महिला शेतमजुरीवर अवलंबून आहेत. परिणामी या महिलांना आरोग्य, निवारा, उपजीविका व सामाजिक सुरक्षा विषयक मूलभूत सेवा व सवलतींची नितांत आवश्यकता आहे..Single Women Survey : राज्यात एकल महिला सर्वेक्षण करा.महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नी लक्ष घातले आहे. त्यांनी परभणी जिल्ह्यापासून एकल महिलांच्या सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सुरुवात केली आहे..जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वेक्षण पूर्ण झाले असून नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण सुरू आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील एकल महिलांसाठी वृद्धापकाळातील योजना खूपच कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक महिलांचे आरोग्य, सुरक्षितता, उदरनिर्वाह यासाठी योजनांची गरज आहे..Single Women Re-Marriage : एकल दहा महिलांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह.जमिनीचा मालकी हक्क, राहते घर, उत्पन्नाचे साधन यांचा अभावही मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. त्यामुळे वयोगट, शैक्षणिक स्तर, सामाजिक परिस्थिती व आर्थिक स्थिती यानुसार केंद्रित, लक्षवेधी आणि स्त्री-हितवादी हस्तक्षेप आवश्यक आहेत..त्याअनुषंगाने शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सीएसआर भागीदार यांच्यामार्फत सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून एकात्मिक धोरणात्मक कृती आराखडा राबवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे..Farmers Single window portal: शेतकऱ्यांच्या 'एक खिडकी पोर्टल' आणि 'अॅप'साठी राज्य सरकारने स्थापन केला कृती गट.एकल महिलांसाठी योजना, साक्षरता कार्यक्रम, साहाय्यता केंद्रे, महिला बचत गटांचे सशक्तीकरण, विकास प्रशिक्षण, गृहउद्योग प्रोत्साहन तसेच आरोग्य व निवारा सुविधा यांचा समावेश असणार आहे. उमेद व माविम यांच्या मदतीने या महिलांचे स्वयंरोजगार उभे करण्याचे विशेष प्रयत्न करण्यात येतील..तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृतिगट तयार करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून एकल महिलांच्या सक्षमीकरणास चालना मिळणार आहे..निरक्षर व अल्पशिक्षित महिलांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पारंपरिक व्यवसाय व आधुनिकीकरण दृष्टिकोनातून त्यांचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे बोर्डीकर यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.