Health Benefits: द्राक्ष, डाळिंब यांसह अन्य फळपिकांनाही नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसत आहे. अशावेळी पर्यायी फळपिकांचा विचार शेतकरी करीत आहेत. अशा शेतकऱ्यांना खडकाळ-मुरमाड जमीन आणि अत्यंत कमी पाण्यात येणारे ड्रॅगन फ्रूट खुणावत आहे. त्यातूनच ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढत आहे. सध्या देशात सुमारे १७ हजार हेक्टरवर या फळपिकाचे क्षेत्र पोहोचले आहे. .ड्रॅगन फ्रूटला देशांतर्गत बाजारपेठेतून चांगली मागणी आहे. सध्या उत्पादकांना दरही बऱ्यापैकी (प्रति किलो ७० ते १२० रुपये) मिळतो. असे असले तरी राज्यात या फळपिकाचा प्रसार-प्रचार प्रामुख्याने रोपवाटिका व्यावसायिकांकडूनच अधिक होत असून, त्यातूनच सध्या क्षेत्र वाढत असल्याचे दिसते. ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र वाढत असताना या फळपिकाच्या शासनमान्य रोपवाटिका मात्र देशात दोनच असून त्याही वर्षभरापूर्वी नव्याने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खासगी शासन मान्य नसलेल्या रोपवाटिका व्यावसायिकांकडून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे..Dragon Fruit Production: ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टर वाढ.ड्रॅगन फ्रूट लागवडीचा सुरुवातीचा खर्च अधिक आहे. अशा वेळी त्यात फसवणूक झाली तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनमान्य रोपवाटिकांची संख्या वाढायला हवी. दोन वर्षांपासून ड्रॅगन फ्रूट, ॲवोकॅडो लागवडीसाठी अनुदान मिळते. परंतु या योजनांतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी रोपे ही शासनमान्य रोपवाटिकेतूनच घेतली गेली पाहिजे, अशी अट आहे. अन्यथा, ड्रॅगन फ्रूटची लागवड तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सर्टिफाइड करून घ्यावी लागते, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट आहे..ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी सुरुवातीचा खर्च हेक्टरी ७.५ ते १२.५ लाख रुपये (लागवड पद्धतीनुसार) येतो. परंतु या पिकाच्या लागवडीसाठी आधी हेक्टरी एक लाख ६० हजार रुपये अनुदान मिळत होते. आता ते दोन लाख ६० हजार केले तरी खर्चाच्या तुलनेत अनुदान कमीच आहे. एवढे अनुदान एकरी मिळायला पाहिजे, अशी शेतकरी मागणी करताहेत. जगामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या ३०० हून अधिक जाती आहेत..Dragon Fruit Production: ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टर वाढ.आपल्याकडे मात्र जेमतेम पाच ते सहा जाती प्रस्थापित झाल्या. कृषी विद्यापीठांनी ड्रॅगन फ्रूटवर संशोधन करून आपली माती आणि हवामानात अधिक चांगल्या रुजणाऱ्या, शिवाय ताजी फळे खाण्याबरोबर प्रक्रियेसाठीच्या जाती विकसित करायला हव्यात. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात या पिकाला स्ट्रोक बसतो. अशा वेळी डाळिंबाच्या धर्तीवर क्रॉप कव्हरसाठी या फळपिकाला अनुदान मिळायला हवे..ड्रॅगन फ्रूटचा समावेश हवामान आधारीत फळपिक विमा योजनेत व्हायला हवा. ड्रॅगन फ्रूट हे पोषणमूल्ययुक्त, आरोग्यदायी फळपीक आहे. ड्रॅगन फ्रूट सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास हातभार लागतो. शिवाय हृदय विकाराच्या आजारात ड्रॅगन फ्रूट खूपच उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. डेंगी, मलेरिया, चिकुन गुनिया या आजारात पेशी वाढविण्याचे काम हे फळ करते..बहुगुणी अशा ड्रॅगन फ्रूट खाण्याबाबत अजूनही म्हणावे तसे प्रबोधन ग्राहकांमध्ये झाले नाही. त्यामुळे शहरी विशिष्ट वर्गाकडून या पिकाची मागणी होते. या फळपिकाचे आरोग्यदायी फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये खाण्याबाबत जाणीव जागृती निर्माण करावी लागेल. ड्रॅगन फ्रूटच्या मूल्यवर्धनातही आपण खूपच मागे आहोत. ड्रॅगन फ्रूटपासून ज्यूस, जॅम, मुरंबा, स्क्वॅश तसेच केचप, स्प्रेड, आइस्क्रीम, सरबत, सिरप आणि पेस्ट्री आदी प्रक्रियायुक्त उत्पादने निर्माण करून ती जगभर पाठवावी लागतील. हे आपण करू शकलो नाही तर सफेद मुसळी, गवार गम, जेट्रोफा आदींप्रमाणे ड्रॅगन फ्रूटचा फुगा फुटून हे पीक पद्धतीतून गायब होऊ शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.