Storage Technique: सोलापूर जिल्ह्यातील वैराग परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी दूरदृष्टी ठेवून गोदामात धान्य साठवणुकीचे तंत्र काही वर्षांपासून आत्मसात केले आहे. चांगल्या बाजारभावासाठी योग्य वेळ येईपर्यंत थांबून मग हा माल विक्रीसाठी बाहेर काढणे व त्यातून ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळवणे ही कुशलताही त्यांनी साध्य केली आहे. राज्य वखार महामंडळाच्या योजना व सहकार्यही त्यांना चांगल्या प्रकारे मिळते आहे. .सोलापूर जिल्ह्यात वैराग हे बार्शी तालुक्यातील सर्वांत मोठे बाजारपेठेचे अर्थात व्यापारी मध्यवर्ती केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. परिसरातील १५ ते २० गावांचा वैरागशी दररोजचा संबंध येतो. हा भाग तालुक्याच्या उत्तर-पूर्व पट्ट्यात येतो. सर्वाधिक सोयाबीन व तूर व त्यासह ज्वारी, गहू, हरभरा, मूग, उडीद ही या भागातील खरीप, रब्बीतील प्रमुख पिके आहेत. द्राक्षे, उसाचीही शेती काही पट्ट्यात होते..खात्रीची सिंचन सुविधा किंवा पाणी साठवण योजना फारशी विकसित नाही, त्याचमुळे पिके व उत्पादनाची अनिश्चितता असते. शिवाय धान्यांच्या बाजारभावांची तितकी हमी नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. परिणामी, काढणीनंतर शेतकऱ्यांना त्वरित बाजार गाठणे गरजेचे राहते. अलीकडील वर्षांत मात्र परिस्थिती बदलली आहे. शेतकऱ्यांना गोदाम साठवणूक तंत्रज्ञानाचा मोठा आधार मिळाला आहे..Warehouse Subsidy: गोदामासाठी मिळणार साडेबारा लाखांपर्यंत अनुदान.वखार महामंडळाच्या गोदामाचा लाभधान्य साठवून ठेवणे व योग्य बाजारभाव मिळू लागल्यानंतर ते विक्रीसाठी उपलब्ध करणे यासाठी शेतकऱ्यांसाठी राज्य वखार महामंडळाची गोदाम योजना संपूर्ण राज्यात राबवली जाते. सोलापूर जिल्ह्यात तालुकानिहाय अंदाजे १३ गोदामे आहेत. पैकी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वैराग येथील उपबाजार आवारात १९८६ मध्ये गोदाम उभारण्यात आले. खरे तर धान्य साठवण्यासाठी वखार महामंडळाची गोदाम योजना, त्याचे फायदे याबाबत अनेक शेतकऱ्यांना माहिती नव्हती. येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके).दत्तक गावांमध्ये घेतलेल्या कार्यक्रमांमधून गोदाम योजनांचा प्रसार केला. केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी यांनी त्याविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळेच ढोराळे, रातंजन, दहिटणे, पिंपरी आदी भागातील शेतकऱ्यांना ही योजना फार पूर्वीपासून माहीत आहे. त्यांनी त्याचा लाभ घेत आपल्या धान्याला जास्तीचा दर मिळवला. या परिसरात १० ते १२ वर्षांपासून वखार महामंडळाच्या गोदामात धान्य ठेवणारे शंभराहून अधिक शेतकरी आहेत. दहा ते १५ व्यापारीही धान्य ठेवतात. जागृती वाढल्याने अलीकडील काळात धान्य साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल आहे..वैराग गोदाम स्थिती व योजना लाभगोदामे सुरक्षित, व्यवस्थित असतात. त्यामुळे मालाची गुणवत्ता टिकून राहते.वैरागचा गोदाम परिसर दीड एकरावर. प्रत्येकी एक हजार टन क्षमतेची दोन गोदामे. अशी एकूण दोन हजार टन साठवणूक क्षमता.ध्या येथे ४३८२ क्विंटल सोयाबीन, १५५१ क्विंटल तूर, १५६२ क्विंटल हरभरा, ६५ क्विंटल गहू आणि २७६ क्विंटल ज्वारी साठविण्यात आली आहे.प्रत्येकी ५० किलोच्या सुतळी पोत्यात धान्य ठेवण्यात येते. सोयाबीन, गहू, तूर, ज्वारीच्या प्रति पोत्याला ७ रुपये २० पैसे, हरभऱ्याला ८ रुपये ९० पैसे भाडेशुल्क..सुमारे तीन महिन्यांपर्यंत धान्य गोदामात ठेवण्याची मर्यादा. मात्र शेतकरी पुढेही धान्याची गुणवत्ता चांगली असेपर्यंत साठवणूक करू शकतात.वैरागच्या गोदामात साठा अधीक्षक, लिपिक, सुरक्षारक्षक मिळून चार कर्मचारी आहेत. चोवीस तास गोदामाला पहारा. साठा अधीक्षकांकडून दर पंधरवड्याला स्थितीची तपासणी. सुरक्षेच्या दृष्टीने रसायनांचीही फवारणी.शेतीमाल खराब होत असल्यास तातडीने संबंधित शेतकऱ्यांना संपर्क करून कल्पना देण्यात येते..Agriculture Technology: अन्नप्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान ‘पल्स इलेक्ट्रिक फील्ड’.भाडेशुल्कात सवलतगोदामात धान्य ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, सात-बारा उतारा या बाबी आवश्यक आहेत. खासगी व्यापाऱ्यांना शासकीय नियमानुसार येथे पूर्ण भाडेशुल्क आकारले जाते. मात्र शेतकऱ्यांना शुल्कात थेट ५० टक्क्यांपर्यंत सवलत आहे. २५ टक्के जागा राखीवही आहे..तारणकर्जाची सुविधा, ४८ तासांत पैसेकाही शेतकरी गोदामातील धान्य एक- दोन वर्षे तरी विक्रीस काढत नाहीत. परंतु त्यांना पैशांची गरज असेल आणि बाजारात दर नसतील तर अशावेळी सुविधा तयार करण्यात आली आहे. शेतीमालाच्या वखार पावतीवर राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून तारण मालाच्या मूल्यांकनानुसार ७० टक्क्यांपर्यंत केवळ नऊ टक्के व्याजदराने कर्ज मिळते. शेतकऱ्यांना तसा प्रस्ताव तयार करून देण्यासंबंधीची सर्व मदत वखार महामंडळाकडून केली जाते. महत्त्वाचे म्हणजे प्रस्ताव पाठविल्यानंतर केवळ ४८ तासांत कर्ज मिळते..बियाण्यांमधून फायदाजिल्ह्यातील पिंपरी येथील संतोष काटमोरे, रातंजन येथील संतोष जाधव, दहिटणे येथील शहाजी काशीद हे शेतकरी सोयाबीन, हरभरा, ज्वारी आदींसाठी ८-१० वर्षांपासून गोदाम योजनेचा लाभ घेत आहेत. साठवणुकीच्या मालाची बाजारात विक्री न करता बीजोत्पादनासाठी विक्री करतात. या ठिकाणी ठेवलेले धान्य कीड-रोगमुक्त, स्वच्छ व दर्जेदार असते. बीजोत्पादनातून त्यांना दीड पट ते दुपटीहून अधिक फायदा मिळतो..शेतकऱ्यांचे धान्य हे आमचेच आहे, याच भावनेतून त्याची सुरक्षा करतो. अधिकाधिक शेतकऱ्यांनी गोदाम साठवणूक योजनेचा फायदा घ्यावा. म्हणजे योग्यवेळी विक्री साधून त्यांना जास्तीचा फायदा मिळवता येईल.डी. ए. जमादार ७९७२५८७०५० साठा अधीक्षक, राज्य वखार महामंडळ, वैराग.दहा वर्षांपासून गोदाम सुविधेचा लाभ घेतो आहे. दरवर्षी ५० क्विंटल सोयाबीन, २० क्विंटल हरभरा येथे ठेवतो. बीजोत्पादनासाठी मुख्य विक्री करतो. त्यातून बाजारभावापेक्षा दीड पट ते काही वेळा दुप्पट नफा मिळतो.संतोष काटमोरे ९९२३८६७००० पिंपरी, ता. बार्शी.माझी ५३ एकर शेती आहे. त्यात सर्वाधिक ५० एकर सोयाबीन असते. दरवर्षी ४०० क्विंटलपर्यंत सोयाबीन गोदामात ठेवतो. त्यातून पुढे चांगले दर मिळतात.संतोष जाधव, रातंजन, ता. बार्शी.गोदामात माल ठेवता येत असल्याने कमी भावांमध्ये विकावा लागत नाही. सुमारे ३० ते ४० टक्के अधिकचा नफा मिळतो.शहाजी काशीद, दहिटणे, ता. बार्शी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.