Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc Election Agrowon
ताज्या बातम्या

Jalgaon APMC : जळगाव बाजार समितीच्या सभापतिपदी निवडीला गालबोट

Team Agrowon

Jalgaon News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडीला शनिवारी (ता. २०) गालबोट लागले. मतदानासाठी आयोजित सभेत संचालकांवर हात वर करून मतदान करण्यासाठी श्यामकांत सोनवणे यांनी दबाव आणला.

सभापतिपदासाठी दुसऱ्या उमेदवारांना अर्जही दाखल करू दिला नाही. तसेच सभागृहातील एकाने या प्रकारास विरोध करणाऱ्या एका संचालकास मारहाणही केली.

ही निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली असून, ती रद्द करण्याची मागणी संचालक लक्ष्मण पाटील यांनी केली आहे. बाजार समितीत सभापती व तर उपसभापतिपदी यांची निवड करण्यासाठी दुपारी सभा बोलाविण्यात आली. सहायक निबंधक कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

महाविकास आघाडीने बहुमत मिळविले होते, पण आघाडीतच मोठे वाद झाले. विशेष म्हणजे जिल्हा निबंधक कार्यालयाचे अधिकारी व आघाडीचे नेते गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला आहे. या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

श्यामकांत सोनवणे यांची निवड

सभापतिपदी एकमेव श्यामकांत सोनवणे यांचा अर्ज दाखल झाला. यामुळे त्यांची निवड झाली.

जिल्हा उपनिबंधक यांचा अंगकाढूपणा

या प्रकाराबद्दल जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांना विचारले असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. तसेच माहिती घेतो, सांगतो, अशी उत्तरे त्यांनी दिली.

दादागिरी केली ः लक्ष्मण पाटील

सभागृहात काहींनी दादागिरी केली. असेच करायचे आहे तर थेट सभापती निवड करायला हवी होती. निवडणुकीचे नाटक कशाला केले. माझ्या नातेवाईकास सभागृहात मारहाण केली. हा प्रकार लोकशाहीला घातक आहे, असे संचालक लक्ष्मण पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT