Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc ElectionAgrowon

Jalgaon Market Committee Election : जळगाव बाजार समितीत सभापती निश्चित होईना

Market Committee Election Update : जळगाव बाजार समितीत सभापती कोण होईल, याबाबत चर्चा झालेली नाही. यातच पराभूत मंडळीने फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
Published on

APMC Jalgaon News : जळगाव बाजार समितीत सभापती कोण होईल, याबाबत चर्चा झालेली नाही. यातच पराभूत मंडळीने फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यामुळे अध्यक्ष निवडीची तारीखही जाहीर झालेली नाही.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, अमळनेर, रावेर, बोदवड, पारोळा येथे महाविकास आघाडीने सत्ता मिळविली आहे. भुसावळ, चाळीसगाव, जामनेर, यावल येथे युतीची सत्ता आली आहे. तर चोपडा, पाचोरा या बाजार समित्यांत त्रिशंकू स्थिती आहे. सर्वच बाजार समित्यांत काही बंडखोरही विविध पक्षांचे निवडून आले आहेत.

या बंडखोरांकडून सभापतीपदाची मागणी केली जात आहे. चोपडा येथे नऊ उमेदवार युतीचे निवडून आले आहेत. तेथेही बहुमतासाठी एका मतदानाची किंवा संचालकाची गरज आहे.

Jalgaon Apmc Election
Jalgaon Market Committee Update : बाजार समित्यांत सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू

पाचोरा येथेही शिवसेने (शिंदे गट) व भाजप स्वतंत्र लढले. भाजपचे दोन संचालक आहेत. त्यांची मदत घ्यायची की आघाडीसोबत जायचे, याचा निर्णय तेथे शिंदे गटाकडून झालेला नसल्याची माहिती आहे.

जळगाव बाजार समितीमध्ये सभारतीपदासाठी तीन जण इच्छुक आहेत. यातील एकालाच संधी मिळेल, ही संधी प्रथम आपल्यालाच मिळावी, यासाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु नेत्यांनी नाव निश्चित केलेले नाही. तसेच फेरमतमोजणी करा, अशी मागणी पराभूत उमेदवारांनी केल्याने सभापती निवडीची तारीख जाहीर झालेली नाही.

जिल्हा बँकेचा फॉर्म्युला येईल का

जळगाव बाजार समितीत जळगाव जिल्हा बँकेत जसा फॉर्म्युला युतीने राबविला, तसा फॉर्म्युला येईल का, अशीही चर्चा आहे. जिल्हा बँकेत सेना - भाजपने रसद पुरवून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांना अध्यक्षपदी निवडून आणले.

पवार यांना महाविकास आघाडीचा मोठा विरोध होता. याचा लाभ युतीने घेतला. असाच प्रकार जळगाव, अमळनेरात होईल, अशीही चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com