Leopard  Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Safari : बिबट्या सफारी जागेबाबत संभ्रम

मानव बिबट्या संघर्षाची सर्वांत मोठी समस्या असलेल्या जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या बिबट्या सफारीच्या जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे सफारी आता कुरण येथे होणार की आंबेगव्हाण येथे होणार, याबाबत संघर्ष होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः मानव बिबट्या संघर्षाची (Human Leopard Clash) सर्वांत मोठी समस्या असलेल्या जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या बिबट्या सफारीच्या (Leopard Safari) जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे सफारी आता कुरण येथे होणार की आंबेगव्हाण येथे होणार, याबाबत संघर्ष होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हा वाद आता मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांपर्यंत जाणार असून, अंतिम निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

जुन्नर (जि. पुणे) तालुक्यातील बिबट्या समस्या कमी होण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांच्या पुढाकाराने आंबेगव्हाण येथे बिबट्या सफारी प्रस्तावित केली होती. त्या वेळी शिवसेना- भाजपच्या महायुती सरकारमधील तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या जागेला तत्त्वतः मंजुरी दिली होती. मात्र सत्तांतरानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात बारामती बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केल्याने, जुन्नर बिबट्या सफारी बारामतीला पळवल्याचा आरोप सोनवणे यांनी पवार यांच्यावर केला होता. यानंतर शरद सोनवणे यांनी उपोषण करून, जुन्नर बिबट्या सफारीच्या सर्व्हेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये दीड कोटींचा निधी मंजूर करून घेतला.

दरम्यान, या निधीतून जुन्नर वन विभागाने विविध जांगाचे सर्व्हेक्षण करून, प्रकल्प अहवालासाठी दोन संस्थांची नियुक्ती केली. या संस्थांनी आंबेगव्हाण आणि कुरण या गावांच्या लगतच्या वनक्षेत्रची पाहणी करून, अहवाल सादर केला. या दोन्ही अहवालांतून कुरण येथे सफारी करण्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे.

या अहवालावर सोनवणे यांनी नाराजी व्यक्त करून, ‘‘जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीची जागा राजकीय आकसापोटी बदलणे चुकीचे असून, हा प्रकल्प आंबेगव्हाण येथेच व्हावा, अशी माझी ठाम भूमिका आहे. कुरण-खानापूर येथे मानवी वस्तीजवळ हा प्रकल्प मंजूर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे,’’ असे म्हटले आहे. सोनवणे यांच्या भुमिकेमुळे सफारी आता कुठे होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

वनमंत्री मुनगंटीवर घेणार अंतिम निर्णय

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीच्या काळात आंबेगव्हाण जागेला तत्वतः मंजुरी दिली होती. या जागेसाठी स्वतः वनमंत्री आग्रही असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेच्या अगोदरचा अहवाल असल्याने वनमंत्री हा अहवाल फेटाळून आंबेगव्हाण येथेच बिबट्या सफारीसाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे आता वनमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: मराठवाड्यात २ दिवस पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

Sangli Rainfall: सांगली जिल्ह्यात पावसाची टक्केवारी घटली

Local Body Elections: आता दिवाळीनंतरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोग

Transformer Issues: बागायती पिकांत सिंचनास वेग, अनेक रोहित्र नादुरुस्त

Crop Insurance: जळगावात कापूस पीकविमा परतावा प्रलंबित

SCROLL FOR NEXT