Crop Damage Compensation Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच

अतिवृष्टी, सततचा पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अजूनही २७१८ कोटी रुपये देणे बाकीच असल्याची स्थिती आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Crop Damage Compensation News औरंगाबाद : अतिवृष्टी, सततचा पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान (Crop Damage) भरपाईपोटी (Compensation) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अजूनही २७१८ कोटी रुपये देणे बाकीच असल्याची स्थिती आहे. तीन महिने उलटूनही मदत न मिळाल्याने शासनाने जाहीर केलेली मदत खात्यावर जमा होणार केव्हा, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जून ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान नैसर्गिक आपत्तीने शेती पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आला होता.

अतिवृष्टी, सततचा पाऊस गोगलगायींच आक्रमण आदी नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ४८ लाख ४५ हजार ७३९ शेतकऱ्यांच्या जिरायत, बागायत व फळ पिकांचे मिळून ३२ लाख २३ हजार १७२ हेक्टरवर नुकसान झाले होते.

या नुकसानीपोटी विभागाकडून ४४८० कोटी ८७ लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी करण्यात आली होती. या मागणीत जिरायत पिकासाठीच्या ४३१२ कोटी ३३ लाख रुपयांसह बागायत पिकांसाठीच्या ५९ कोटी ६२ लाख ७५ हजार तर फळ पिकांसाठीच्या १०८ कोटी ९१ लाख ३४ हजार रुपयांच्या निधी मागणीचा समावेश होता.

सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला १००८ कोटी ३० लाख ८१ हजार त्यानंतर ५९७ कोटी ५४ लाख, त्यानंतर ९८ कोटी ५८ लाख व ५९ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आला.

परंतु अजूनही सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी आवश्यक १२१४ कोटी ७२ लाख ५७ हजार रुपये तसेच सप्टेंबर-ऑक्टोबर २०२३ मध्येच सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानभरपाईपोटी देणे आवश्यक असलेला १५०१ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी अजूनही शासनाकडून वितरणासाठी उपलब्ध झाला नाही.

त्यामुळे तीन महिने उलटूनही शासनाची जाहीर मदत न मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेत भर पडली आहे. रब्बीच पीक अजून हाती येणे बाकी आहे.

दुसरीकडे मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या सोयाबीन व कापसाच्या उत्पादनात घट दिसते आहे. शिवाय या पिकांच्या दरातूनही शेतकऱ्यांच्या हाती फार काही पडेल असे दिसत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची प्रतीक्षा आहे.

जेथे १० ते १२ क्विंटल सोयाबीन व्हायचे तेथे ३ क्विंटल २७ किलो झालेय. कपाशी जेथे दहा क्विंटल किमान पिकायची तेथे तीनच क्विंटल झाली. तूर पार उबळून गेली. मोसंबीची ८० टक्के फळगळ झाली. शासनाने मदत जाहीर केली पण अजून पदरात पडली नाही.

- रावसाहेब किसनराव जाधव, नुकसानग्रस्त शेतकरी, जामखेड, ता. अंबड, जि. जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत, चारा छावण्याऐवजी थेट अनुदान द्या, रोहित पवारांची मागणी

Water Theft: जत तालुक्यातील पाणीचोरांवर कठोर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Fodder Crisis : माळराने ओसाड, शेळ्या-मेंढ्या उपाशी!

Cotton Harvesting: खानदेशात कापूस वेचणीची लगबग सुरू; मजुरांची परवड

Fodder Shortage: अकोला जिल्ह्यात बाहेरील पशुधनाच्या चराईवर बंदी

SCROLL FOR NEXT