Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Dmage : पावसामुळे चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

या पावसामुळे नजर अंदाजे १५९ गावांतील १० हजार ४०५ शेतकऱ्यांचे ४ हजार २८० हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, भुईमूग या पिकांचे क्षेत्र जादा असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Published on

सांगली ः जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून परतीचा मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) झाला. या पावसामुळे नजर अंदाजे १५९ गावांतील १० हजार ४०५ शेतकऱ्यांचे ४ हजार २८० हेक्टवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. यामध्ये सोयाबीन, भुईमूग या पिकांचे क्षेत्र जादा असल्याचा अंदाज कृषी विभागाने (Agriculture Department) व्यक्त केला आहे. बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे (Crop Damage Survey) सुरू झाले आहेत.

Crop Damage
Kharif Crop Damage : खरिपाचे नुकसान; रब्बी हंगामही अडचणीत

जिल्ह्यात १ ते १८ ऑक्टोपर्यंत परतीच्या पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर काही ठिकणी सतत पाऊस पडला. यामुळे सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका, भात, भाजीपाला, द्राक्ष आणि हळद पिकांचे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : आता तरी शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा

गेल्या आठवड्यात कृषी विभागाने नजर अंदाजे १३०० हेक्टरवरील पिके बाधित झाले असल्याची शक्यता वर्तवली होती. परंतु त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक भागातील झालेला पाऊस आणि बाधित झालेल्या पिकांची माहिती संकलित केली. त्यानुसार नजर अंदाजे क्षेत्रात वाढ झाली आहे. आतापर्यंत ४ हजार २८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील बाधिक झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्यानंतर कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसान झालेल्या पिकांची अचूक आकडेवारी समोर येईल. परंतु पावसामुळे बाधित झालेल्या पिकांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय नुकसान पिकांची आकडेवाडी (क्षेत्र हेक्टर)

तालुका क्षेत्र बाधित गावे शेतकरी संख्या

मिरज २५४ २३ ७३६

वाळवा १७५८.४० ७८ ४६०७

तासगाव १८८३.५० ३२ २९३३

खानापूर ०२.६० २ ३

कडेगाव ९.७० २ ३०

जत १०७२.२० २२ २०९६

एकूण ४२८०.५७ १५९ १०४०५

परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत. सध्या ४ हजार २८० हेक्टरवरील पिके नुकसान झाले असल्याचा नजर अंदाज आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अचूक आकडेवारी स्पष्ट होईल.
प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com