Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

केंद्रीय सहकार मंत्री शहा यांना इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवण्याची विनंती केली. मात्र केंद्र सरकारनं या विनंतीला गांभीर्यानं घेतलं नाही.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

इथेनॉल निर्मितीच्या परवानगीवरून संभ्रम?

बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्याच्या बातमी समोर आली होती. मात्र अजूनही त्याबाबतचा शासन आदेश किंवा तशी सूचना सहकार विभागाला मिळालेली नसल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये ऊस उत्पादक पट्ट्यात फटका बसू शकतो, अशी शक्यता लक्षात येताच केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीच्या परवानगीची बातमी पेरली गेली. त्यामुळे साखर उद्योग आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी इथेनॉल निर्मितीचा लगाम आवळला होता. त्यामुळे देशभरात पाच ते सात लाख टन बी हेवी मोलॅसिसचा साठा कारखान्यांकडे शिल्लक होता. त्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यात आली तर साठा वाया जाणार होता. त्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

शहा यांना इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवण्याची विनंती केली. मात्र केंद्र सरकारनं या विनंतीला गांभीर्यानं घेतलं नाही. पण मागच्या आठवड्यात मात्र लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान इथेनॉलवरील निर्बंधाचा फटका बसू शकतो, अशी शक्यता लक्षात येताच केंद्र सरकारच्या वतीनं महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बी हेवी मोलॅसिसवरील बंदी उठवल्याची घोषणा करून टाकली. प्रत्यक्षात मात्र या घोषणेचा शासन निर्णय आलाच नाही. त्यामुळं संभ्रम निर्माण झालेला आहे. याआधी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याची अशीच अफवा उठवली होती. परंतु प्रत्यक्षात कांदा निर्यातबंदी उठवण्यात आलेली नाही. 

Ethanol Production
Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

पीक उत्पादनाच्या अचूक आकडेवारीसाठी 'एआय'चा वापर 

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पीक उत्पादनाची नियमित डिजिटल आकडेवारी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र स्ररकारने योजना आखल्याची माहिती इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेला एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. उत्पादनाची अचूक आकडेवारी न मिळाल्यामुळं सरकार शेतमालाची निर्यातबंदी करतं. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. उत्पादनाची आकडेवारी वेळेवर आणि अचूक मिळावी, यासाठी सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेणार आहे. डिजिटल पीक सर्वेक्षणाचं एक मोबाइल अॅप तयार करून राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांकडून पीक पेरणीची माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यातून अचूक अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विश्लेषण करण्याचं कृषी मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. यावर काम सुरू असून पुढच्या खरीप हंगामापासून अॅप उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलीय. 

मे महिन्यात उष्णतेची लाट येणार ? 

मे महिन्यात दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेश, गुजरात, मराठवाडा आणि विदर्भात ८ ते ११ दिवस उष्णतेच्या लाटांची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बिझनेस लाईन या वृत्तसंस्थेला बुधवारी दिली आहे. उष्णतेच्या लाटांचा शेती पिकांना मोठा फटका बसतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. महापात्रा म्हणाले, "एप्रिलमध्ये पूर्व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात उष्णतेची लाट होती. एप्रिलमध्ये दक्षिण द्वीपकल्पीय भागात सरासरी ३१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. ऑगस्ट महिन्यात ला निना स्थितीमुळे चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस पडला होता. ऑगस्ट महिन्यात ३६ टक्के तूट होती. परंतु यंदा मात्र ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडू शकतो, "असंही महापात्रा म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com