Weather Update
Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : आजपासून थंडी वाढण्याची शक्यता

टीम ॲग्रोवन

पुणे : उत्तरेकडील थंडी (Winter) महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने राज्यात आजपासून थंडी (Cold Weather) वाढण्याची शक्यता आहे. ही थंडी पुढील चार दिवस राहून त्यानंतर गारठा पुन्हा काहीसा कमी होण्याचे संकेत आहेत. गुरुवारी (ता. १७) धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात (Wheat Research Center) राज्यातील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढू लागली आहे. गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील हे गार वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.

राज्याच्या पहाटे थंडी आणि दुपारी चटका ही स्थिती कायम आहे. रात्री उशिरापासून गारठा वाढत आहे. तर दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन उन्हाचा चटका जाणवत आहे. गुरुवारी राज्याच्या किमान तापमानात घट होत पारा ११ ते २१ अंशांच्या दरम्यान होता. पुढील चार दिवस किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

किमान तापमान कमी होत असतानाच राज्यात कमाल तापमान मात्र सातत्याने ३० ते ३५ अंशांच्या आसपास कायम आहे. रत्नागिरी येथे कमाल ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १८) राज्यात आकाश निरभ्र राहून, कोरड्या हवामानासह, किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार

अंदमान समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली शनिवारपर्यंत (ता. १९) आणखी तीव्र होण्याचे संकेत असून, ही प्रणाली तमिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. नैॡत्य अरबी समुद्रात विषूववृत्ताजवळ समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.६ (१२.९), जळगाव ३२.७ (१४.५), धुळे ३२ (११.५), कोल्हापूर ३१.६ (१७.१), महाबळेश्वर २७.१(१२.८), नाशिक ३०.९ (१३.९), निफाड २९.६ (११.५), सांगली ३२.३(१५.८), सातारा ३०.७(१३.४), सोलापूर ३३.४ (१४.७), सांताक्रूझ ३३(२०.४), डहाणू ३१.६ (२०.७), रत्नागिरी ३५.२ (२०.३), औरंगाबाद ३१ (१२.५), नांदेड ३२.४ (१४.८), परभणी ३१.९ (१४.१), अकोला ३२.३ (१५.२), अमरावती ३२.४ (१३.८), बुलडाणा ३०.२(१५.८), ब्रह्मपुरी ३२.७ (१५.९), चंद्रपूर २९.९ (१५.८), गडचिरोली २९.०(१४), गोंदिया ३०.५(१३.५), नागपूर ३१.४ (१४.८), वर्धा ३१.२ (१४), वाशीम ३२.५ (-), यवतमाळ - (१२.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT